संजय राऊत यांनी अभ्यास करून बोलावे; नाना पटोलेंना मानसिक उपचाराची गरज : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 06:14 PM2022-01-30T18:14:10+5:302022-01-30T18:59:28+5:30

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत व कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली.

mla chandrashekhar bawankule commented on nana patole on mahatma gandhi, sanjay raut on wine, and sitaram kunte | संजय राऊत यांनी अभ्यास करून बोलावे; नाना पटोलेंना मानसिक उपचाराची गरज : चंद्रशेखर बावनकुळे

संजय राऊत यांनी अभ्यास करून बोलावे; नाना पटोलेंना मानसिक उपचाराची गरज : चंद्रशेखर बावनकुळे

googlenewsNext

नागपूर : या सरकारने किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय घेऊन जे पाप केले आहे. ते पाप लपवण्यासाठी तुम्ही मागच्या युती सरकारवर आरोप करत आहात. संजय राऊत (Sanjay Raut) बावचळले आहेत. त्यांना काय बोलावे याचे भान राहिलेले नाही, अशी टीका भाजप नेते व विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.

ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकाटीप्पणी केली. आमच्या सरकारच्या काळात राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी घरपोच मद्यविक्री सुरू करावी व त्यासाठी एक्साईज आकारावा अशी मागणी केली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मिनिटात तो प्रस्ताव फेटाळून लावला होता, असे बावनकुळे म्हणाले. 

संजय राऊत यांना वाईनची किराणा दुकानात विक्रीला परवानगी या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. परवा संजय राऊत म्हणाले कि मागच्या सरकारच्या काळात असा प्रस्ताव आला होता. मात्र मागचे सरकार भाजप-सेनेचे नव्हते का? तेव्हा संजय राऊत सेनेत नव्हते का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नाना पटोले यांना मानसिक उपचार करून घ्यावेत

नाना पटोले यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहणार आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. अशा नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी ठेवू नये, अशी विनंती त्या पत्रातून करणार आहे. यापूर्वीही राज्यात वध आणि हत्या या मुद्दयावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यांनी असे वक्तव्य करू नये, मानसिक उपचार करून घ्यावेत असेही बावनकुळे म्हणाले.

सीताराम कुंटे (Sitaram Kunte) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray) यांचे प्रधान सल्लागार आहेत, त्यांनी ईडी समोर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेबद्दल जे मत व्यक्त केले आहे, ते गंभीर आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. मात्र सीताराम कुंटे यांनी त्या वेळेस तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आयपीएस यांच्या बदल्या संदर्भात कोणाला कुठे पोस्टिंग द्यायची, याची नावासकट यादी पाठवत होते असे ईडीला माहितीत सांगितले आहे. हे अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांना कोणाचा आशीर्वाद होता हे समोर आलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title: mla chandrashekhar bawankule commented on nana patole on mahatma gandhi, sanjay raut on wine, and sitaram kunte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.