महात्मा गांधीसह आमदार, आयुक्त आणि नागपूरकरांनी हाती घेतला झाडू

By मंगेश व्यवहारे | Published: October 1, 2023 06:26 PM2023-10-01T18:26:34+5:302023-10-01T18:28:13+5:30

एक तारीख एक तास स्वच्छतेचा : हजारो नागरिकांनी केले स्वच्छतेसाठी श्रमदान

mla commissioners and nagpurkar took up the broom for cleaning campaign | महात्मा गांधीसह आमदार, आयुक्त आणि नागपूरकरांनी हाती घेतला झाडू

महात्मा गांधीसह आमदार, आयुक्त आणि नागपूरकरांनी हाती घेतला झाडू

googlenewsNext

मंगेश व्यवहारे, नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त १ ऑक्टोबरला ‘एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान’ करण्याचे आवाहन नागपूरकरांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत छोटे महात्मा गांधी यांच्यासह आमदार, मनपा आयुक्त, अधिकारी व नागपूरकरांनी हाती झाडू घेतला. शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने शहरातील ऐतिहासिक स्थळे, इमारती, महत्वाची ठिकाणे तसेच रहिवासी वस्त्या अशा ७३ ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्यात केली.

नागपूर शहरातील जागतिक कीर्तीची दीक्षाभूमी, हेरिटेज स्थळ कस्तुरचंद पार्क, प्रधान डाक कार्यालय (जीपीओ), ऐतिहासिक श्रीमंत महाराणी सती काशीबाई साहेब भोसले राजघाट , गांधीसागर तलाव व चाचा नेहरू उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्टेशन, मनपा मुख्यालय यासह ७३ ठिकाणी नागपूर महानगरपालिकेद्वारे १५० स्वयंसेवी संस्था आणि सुमारे २० हजाराहून अधिक नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानात आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक यांच्यासह मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी स्वत: सहभागी झाले होते.

- या स्वयंसेवी संस्थांनी नोंदविला सहभाग

मनपाद्वारे शहरातील वेगवेगळ्या ७३ ठिकाणी आयोजित स्वच्छता श्रमदान अभियानामध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशन, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, नागपूर@२०२५, तेजस्विनी महिला मंच, मार्केट असोसिएशन, लिडर क्लब, किंग कोब्रा, ताजुद्दीन बाबा ट्रस्ट, लोटस ऑर्गेनायझेशन, कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन, आयजीएसएसएस, एसएचजीएस, गुरूद्वारा टीम या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदविला.

- विद्यार्थ्यांचे वेशभूषेसह श्रमदान

शहरातील विविध श्रमदान ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या शाळांसह इतर शाळांच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व अन्य थोर राष्ट्रपुरूषांची वेशभूषा करून श्रमदान केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ३५० विद्यार्थी, एनसीसी चे विद्यार्थी आदींनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता श्रमदानात सहभाग नोंदविला.

Web Title: mla commissioners and nagpurkar took up the broom for cleaning campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर