संघ मुख्यालयात आमदाराने केले ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:54 AM2018-01-28T00:54:12+5:302018-01-28T00:58:48+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गणतंत्रदिन साजरा करण्यात आला. यावेळी कधी नव्हे ते नागो गाणार यांच्या रूपात एका आमदाराला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. यामुळे संघ मुख्यालयात एक नवा इतिहासच रचल्याची चर्चा होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गणतंत्रदिन साजरा करण्यात आला. यावेळी कधी नव्हे ते नागो गाणार यांच्या रूपात एका आमदाराला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. यामुळे संघ मुख्यालयात एक नवा इतिहासच रचल्याची चर्चा होती.
शुक्रवारी सकाळी संघ मुख्यालयात ध्वजारोहण पार पडले. त्यावेळी महानगर संघचालक राजेश लोया, आ.गिरीश व्यास, विविध प्रचारक, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यंदा संघाचे राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारी प्रवासात असल्याने एकाचीही उपस्थिती राहू शकली नाही. ध्वजारोहणाचा मला मिळालेला मान हा राज्यातील शिक्षकांचा सन्मानच आहे, अशी भावना यावेळी गाणार यांनी बोलून दाखविली.
स्मृतिमंदिरातदेखील झाले ध्वजारोहण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसरातदेखील शुक्रवारी सकाळी ध्वजारोहण झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.राज गजभिये यांनी ध्वजारोहण केले. यावेळी महानगर सहकार्यवाह रवींद्र बोकारे हेदेखील उपस्थित होते.