राम शिंदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड; निलम गोऱ्हे म्हणाल्या, "तुम्हाला मागच्या दाराने यावं लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:04 IST2024-12-19T11:59:40+5:302024-12-19T12:04:35+5:30

आमदार प्रा.राम शिंदे यांचा विधानपरिषदेचे नवे सभापती म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे.

MLA Ram Shinde has been unanimously elected as the new Chairman of the Maharashtra Legislative Council | राम शिंदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड; निलम गोऱ्हे म्हणाल्या, "तुम्हाला मागच्या दाराने यावं लागेल"

राम शिंदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड; निलम गोऱ्हे म्हणाल्या, "तुम्हाला मागच्या दाराने यावं लागेल"

Maharashtra Legislative Council: विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपकडून राम शिंदे यांनी बुधवारी सकाळी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. तर राम शिंदे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार राम शिंदे यांच्या निवडीची घोषणा आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात केली. त्यानंतर राम शिंदे हे त्यांच्या आसनाकडे जात असताना निलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानामुळे विधानपरिषदेमध्ये हास्यकल्लोळ उडाला. 

विधान परिषदेच्या सभापतीपदी प्रा.राम शंकर शिंदे यांची गुरुवारी आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी राम शिंदे यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्यबद्दल विरोधी पक्षाचा सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. मात्र उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले.

प्राध्यापक राम शिंदे यांनी सभापतीचे आसन स्विकारावे अशी विनंती निलम गोऱ्हे यांनी केली. "त्यांना पुढच्या बाजून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे त्यांना मागच्या दाराने आणावं लागणार आहे. त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करणार नाही. शंभुराजे देसाई यांची इच्छा होती की त्यांना थेट पुढून आणावं. मात्र त्यासाठी आसन कापावं लागलं असतं. ते बरोबर झालं नसतं, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

यानंतर सभापती राम शिंदे यांना त्यांच्या आसनापर्यंत नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर सभापती राम शिंदे हे मागच्या बाजूने येऊन आसनस्थ झाले. यावेळी त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. 
 

Web Title: MLA Ram Shinde has been unanimously elected as the new Chairman of the Maharashtra Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.