"ज्यांना केंद्रात जबाबदारी दिली त्यांनी साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले नाही"
By कमलेश वानखेडे | Published: September 13, 2023 04:34 PM2023-09-13T16:34:20+5:302023-09-13T16:36:23+5:30
रोहित पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका
नागपूर : विदर्भाची जवाबदारी ज्या नेत्याला दिली ते फक्त जिल्हा पर्यंत राहिले. त्यांना साहेबांनी केंद्रात जवाबदारी दिली. त्यांनी साहेबांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचविले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता केली.
रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी दाखल झाले. त्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दरवेळी नागपूरला आल्यावर दीक्षाभूमीवर येऊन प्रेरणा घेत असतो, भाजप बलाढ्य शक्तींच्या विरोधात काम करण्याची प्रेरणा मिळते.
लोकसंख्येचे प्रमाणात काही वर्षांपूर्वी इडब्ल्यूएस कोटा दिला आहे, केंद्राने विशेष अधिवेशनात बोलवावे,सामाजिक दृष्टीने सर्वांना आरक्षण मिळेल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला होता तेंव्हा भाजपचेच लोक कोर्टात गेले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून भाजपचे लोक कोर्टात गेले, भाजपचे लोक दुटप्पी भूमिका घेतात. वेगवेगले आरक्षण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
अतिरिक्त आरक्षण मराठ्यांना देऊ शकतात. पण ट्रिपल इंजिनचे सरकार मोठ्या इंजिन समोर चालते का, हा मोठा प्रश्न आहे. जे चाळीस आमदार शिंदे गटासोबत गेले त्यांच्या सुरक्षेवर वर्षात दीडशे कोटी खर्च, जाहिरातीवर 50 कोटी, शासन आपल्या दारी एका सभेला 10 कोटी खर्च येतो हे खर्च कमी करा. आजचे नेते राज्य चालवायचा सक्षम नाही. तीस लाख तरुण नोकरीसाठी प्रयत्न करत आहे ही त्यांची चेष्टा आहे, अशी टीका त्यांनी केली.