मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दाखल; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 11:43 AM2022-12-23T11:43:22+5:302022-12-23T11:50:04+5:30

नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

MNS chief Raj Thackeray arrives in Nagpur Airport; Enthusiasm among workers | मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दाखल; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दाखल; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

googlenewsNext

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे नेते राज ठाकरे आज शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या एक दिवसीय दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वितरण करणार आहेत.

आज सकाळी साडेअकरा दरम्यान त्यांचे विमानाने आगमन झाले असून अधिवेशन काळातच त्यांचा दौरा होत असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील महिन्यात मनसेमध्ये झालेल्या फेरबदलानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.

आज वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित मेळाव्यात ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असून नियुक्तिपत्रे देणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि विदर्भातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Web Title: MNS chief Raj Thackeray arrives in Nagpur Airport; Enthusiasm among workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.