वाढीव वीज बिलाबाबत मनसेचा महावितरणला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 07:56 PM2020-06-29T19:56:08+5:302020-06-29T19:57:34+5:30
कोरोनामुळे ३ महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने ३ महिन्याचे वीज बिल पाठवून झटकाच दिला आहे. महावितरणने ५० टक्के वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना घेराव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे ३ महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने ३ महिन्याचे वीजबिल पाठवून झटकाच दिला आहे. महावितरणने ५० टक्के वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना घेराव करण्यात आला. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेत ५० टक्के वीज बिल माफ करण्याची मागणी केली. घरगुती ग्राहकांकडून पहिल्या स्लॅबमध्ये ३.४६ रुपये युनिटप्रमाणे बिल आकारावे. महावितरणने लावलेले विविध प्रकारचे कर रद्द करावेत आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम, मनीषा पापडकर, सचिन धोटे, पूनम घाडगे, स्वाती जयस्वाल, मंजूषा पानबुडे, मंगेश शिंदे, प्रयाग नारनवरे, अभय व्यवहारे आदी उपस्थित होते.