मो. रफी, किशोर आणि महेंद्र कपूर यांच्या गीतांचा ‘त्रिरत्न’

By admin | Published: January 7, 2015 12:58 AM2015-01-07T00:58:04+5:302015-01-07T00:58:04+5:30

रुपेरी पडद्यावरील अगणित अमिट गीतांचे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांना मानवंदना देणारा ‘त्रिरत्न’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह,

Mo Rafi, Kishore and Mahendra Kapoor's songs 'Triratna' | मो. रफी, किशोर आणि महेंद्र कपूर यांच्या गीतांचा ‘त्रिरत्न’

मो. रफी, किशोर आणि महेंद्र कपूर यांच्या गीतांचा ‘त्रिरत्न’

Next

संदीप जी. एन्टरटेनर्स : नृत्य आणि गीतांचे सादरीकरण
नागपूर : रुपेरी पडद्यावरील अगणित अमिट गीतांचे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांना मानवंदना देणारा ‘त्रिरत्न’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. संदीप जी. एन्टरटेनर्सतर्फे आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना नीलिमा गावंडे यांची होती. यात धनराज राऊत, शकिल कुरेशी, शमीम काझी, मो. सलिम, शाहिद कुरेशी, सागर मधुमटके, रंजना कनोजिया, रचना खांडेकर, नीलिमा गावंडे या गायकांचा सहभाग होता.
हिंदी चित्रपट गीतांच्या सुवर्णयुगातील या लखलखत्या त्रिरत्नांच्या वैविध्यपूर्ण गीतांची ही आनंददायी अनुभूती होती. गीतांची एकूणच निवड श्रोत्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी होती. धनराज यांनी सादर केलेल्या ‘देखा है तेरी आँखो मे..’ गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘बडी सुनी है ये जिंदगी.., बिते हुए लम्हे किसके साथ तो होगे..., सारे शहर मे आप सा कोई नही..., चाहुंगा मै तुझे सांज सवेरे..., मुसाफिर हुं यारो..., चला भी आजा...’ आदी गीतांसह काही युगल गीतांचेही तयारीने सादरीकरण करण्यात आले. यात ‘आज की मुलाकात बस इतनी..., लेकर हम दिवाना दिल..., कोरा कागज था मन मेरा...’ आदी गीते रचना, नीलिमा, सागर आणि मो. सलिम यांनी सादर करून रसिकांची दाद घेतली. कार्यक्रमात काही गीतांवर नृत्याचेही सादरीकरण करण्यात आले. सागर मधुमटके यांनी किशोरकुमार मिडलेचे केलेले सादरीकरण रसिकांची दाद घेणारे होते. अब्दूल जहीर यांचे संगीत संयोजन होते. मो. सलिम आणि शाहिद कुरेशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. स्थानिक वादकांनी सुयोग्य साथसंगत केली. कार्यक्रमाला सुप्रिया दास, अनिल बोबडे, सुनील भुते प्रामुख्याने उपस्थित होते. अतिथींचे स्वागत नीलिमा गावंडे आणि संदीप गावंडे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Mo Rafi, Kishore and Mahendra Kapoor's songs 'Triratna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.