मोबाईल ॲप लावणार अपघातांना ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:26+5:302021-07-07T04:11:26+5:30

नागपूर : देशभरात हाेणाऱ्या रस्ते अपघातांचा डेटा गाेळा केल्यानंतर त्याचे विश्लेषण करून अपघात कमी करण्याचे उपाय शाेधण्यासाठी डिजिटल माध्यमातून ...

Mobile app to break accidents! | मोबाईल ॲप लावणार अपघातांना ब्रेक !

मोबाईल ॲप लावणार अपघातांना ब्रेक !

Next

नागपूर : देशभरात हाेणाऱ्या रस्ते अपघातांचा डेटा गाेळा केल्यानंतर त्याचे विश्लेषण करून अपघात कमी करण्याचे उपाय शाेधण्यासाठी डिजिटल माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटिग्रेटेड राेड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला असून माेबाईल ॲपच्या माध्यमातून देशभरातील रस्ते अपघाताचा डेटा गाेळा केला जात आहे. आयआयटी चेन्नईद्वारे या डेटाचे विश्लेषण केले जाणार आहे. नागपूर जिल्ह्यातही माेबाईल ॲपवर अपघातांचा डेटा अपलाेड करण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्यात प्रकल्पाच्या कामकाजासाठी पाेलीस दलातील एक व आरटीओतील एक अशा दाेन नाेडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पाेलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ॲन्ड्राईड ॲपमध्ये प्राणांतिक, गंभीर, किरकाेळ व विना दुखापतग्रस्त अपघातांची माहिती भरण्यात येत आहे. सध्या शहर पाेलीस व आरटीओ यांचाच या प्रकल्पात सहभाग आहे. मात्र येत्या काळात महामार्ग पाेलीस, ग्रामीण पाेलीस, जीआरपीएफ तसेच मेडिकल आणि इतर विभागांना जाेडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील रस्ते अपघात

अपघात जखमी मृत्यू

२०१९ १००७ १०४२ २५०

२०२० ७७३ ७५२ २१३

२०२१ (मेपर्यंत) ३५० ३६४ १११

१९२ जणांना प्रशिक्षण

ॲन्ड्राईड ॲपचे प्रशिक्षण देण्यासाठी १४ जून २०२१ राेजी अलंकार सभागृह, पाेलीस मुख्यालय येथे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. यामध्ये शहरातील ३३ पाेलीस स्टेशनमधील १०७ पाेलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले. यांसह आजपावेताे शहर पाेलीस दलातील १९२ पाेलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नॅशनल इन्फार्मेशन सेंटर (एनआयसी) चे हरीश अय्यर व नितेश तायवाडे या अधिकाऱ्यांनी सर्व गटातील अपघात ॲपमध्ये कसे भरावे याबाबत प्रशिक्षण दिले तर वाहतूक पाेलीस उपायुक्तांनीही मार्गदर्शन केले.

मेपर्यंत शहर-ग्रामीणच्या ५९५ अपघातांची नोंद

काेराेना व लाॅकडाऊनमुळे माेबाईल ॲपचे काम उशिरा सुरू झाले असले तरी यावर्षीच्या अपघातांचा डेटा जानेवारीपासूनच अपलाेड करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जानेवारीपासून मेपर्यंत शहरात झालेल्या ३५० अपघातांची नाेंद या ॲपमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १०२ नागरिकांचा मृत्यू झाला तर ३६४ नागरिक जखमी झाल्याची नाेंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागाचीही ॲपमध्ये समावेश करण्यात आला असून मेपर्यंत ग्रामीण क्षेत्रातील २४५ अपघातांची नाेंद करण्यात आली आहे.

या ॲपद्वारे अपघात स्थळाचे जीपीएस लाेकेशनचीही नाेंद केली जाते. त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा करणे सहज शक्य हाेते. शिवाय आरटीओला माणसांद्वारे रिपाेर्ट पाठविण्याची गरज संपविली आहे. आरटीओचे कर्मचारी ॲपद्वारेच ऑनलाईन तपासणी करणे शक्य हाेत आहे. डेटा तयार हाेईल, अपघातांचे ब्लॅकस्पाॅट लक्षात येतील, कारणे लक्षात येतील आणि अपघात कमी करण्यासाठी उपाययाेजना आखण्यास मदत हाेईल.

- अमित डाेळस, पाेलीस निरीक्षक, पाेलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालय.

Web Title: Mobile app to break accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.