मोबाईल अॅपवर मिळणार रेल्वेचे जनरल तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:45 AM2018-10-11T11:45:47+5:302018-10-11T11:46:27+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोबाईल युटीएस अॅपच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना जनरल तिकीट बुक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
Next
ठळक मुद्देमध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोबाईल युटीएस अॅपच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना जनरल तिकीट बुक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ही सुविधा नागपूर विभागात १२ आॅक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (क्रिस) तर्फे तयार अनारक्षित तिकिटींग अॅप (युटीएस) च्या माध्यमातून तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे. युटीएस मोबाईल अॅपवरून प्रवासी पॅसेंजर रेल्वेगाड्याशिवाय मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे जनरल तिकीट बुक करू शकतात. नागपूर विभागात हे आॅनलाईन युटीएस अॅप सुविधा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना डिजिटल तिकीट मिळणार आहे.