ओला, उबरच्या विंड स्क्रीनवर मोबाईल : गूगल मॅप पाहून चालवितात वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:31 PM2018-06-11T23:31:23+5:302018-06-11T23:32:00+5:30

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वायरलेस मोबाईलचा वापर करणे, एवढेच नव्हे तर रस्त्यावर थांबून मोबाईल हाताळणे हे बेकायदेशीर ठरत असताना उपराजधानीत मात्र ओला, उबर चालक विंड स्क्रीनवर मोबाईल लावून ‘गूगल मॅप’ पाहत सर्रास धावतात, हा गुन्हा नाही का? असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Mobile, Mobile on the Uber's Wind screen: Vehicles that drive Google Maps | ओला, उबरच्या विंड स्क्रीनवर मोबाईल : गूगल मॅप पाहून चालवितात वाहने

ओला, उबरच्या विंड स्क्रीनवर मोबाईल : गूगल मॅप पाहून चालवितात वाहने

googlenewsNext
ठळक मुद्देमोठा अपघात झाल्यावरच जाग येणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वायरलेस मोबाईलचा वापर करणे, एवढेच नव्हे तर रस्त्यावर थांबून मोबाईल हाताळणे हे बेकायदेशीर ठरत असताना उपराजधानीत मात्र ओला, उबर चालक विंड स्क्रीनवर मोबाईल लावून ‘गूगल मॅप’ पाहत सर्रास धावतात, हा गुन्हा नाही का? असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मेट्रो सिटी म्हणून होऊ घातलेल्या नागपुरात खासगी कंपन्यांचे म्हणजे ओला, उबर या ‘वेब बेस्ड टॅक्सी’ सेवेचे महत्त्व वाढले आहे. घरपोच व आरामदायी सेवा असल्याने या कॅबला अधिक पसंती दिली जात आहे. गरजेनुसार वेळेत कॅब उपलब्ध होत असल्याने अनेकांचा प्रवास सुकर झाला आहे. कॅबचे आॅनलाईन बुकिंग केल्यानंतर वाहनाचा नंबर, प्रकार, चालकाचे नाव, त्याचा मोबाईल नंबर याचा मॅसेज येत असल्याने प्रवाशांच्या सोयीचे झाले आहे. कॅब चालकाकडे जीपीएस किंवा जीपीआरएस यंत्रणेसह वाहनात मार्गक्रमण केलेले अंतर, मार्ग व भाडे दर्शवणारा निदर्शक असणे बंधनकारक केल्याने याचा फायदाही प्रवाशांना होत आहे. परिवहन विभागानेही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅपआधारित या टॅक्सी सर्व्हिसेसना नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार ओला, उबर टॅक्सींना ज्या शहरात व्यवसाय करायचा असेल, त्याची नोंदणी आवश्यक केली आहे. अ‍ॅपवर आधारित असा स्वतंत्र परवाना घेणे बंधनकारक केले आहे. उपराजधानीत रोजगार वाढला हेही तेवढेच खरे असताना, मात्र या कॅबच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन गंभीरतेने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे.
काय म्हणतो मोटार कायदा
वाहन चालविताना लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता मोबाईलच नव्हे तर वायर अथवा वायरलेस मोबाईलचा वापर करणे, सिग्नलवर तसेच रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईल हाताळणे हा महाराष्ट्र  मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार गुन्हा ठरतो. मात्र बहुसंख्य कॅब चालक वाहनाच्या विंड स्क्रीनजवळ मोबाईल अडकवून ‘गूगल मॅप’ पाहत रहदारी करताना दिसतात, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही.
‘गुगल मॅप’ पाहत वाहन चालविणे गुन्हाच

विंड स्क्रिनवर मोबाईल अडकवून ‘गुगल मॅप’ पाहत चालक जर वाहन चालवित असेल तर तो गुन्हा ठरतो. परंतु चालकाने रस्त्याच्याकडेला गाडी थांबवून त्याचा वापर केल्यास तो गुन्हा ठरत नाही.
-शरद जिचकार
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

वैयक्तिक व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा
वाहन चालविताना एक सेंकद जरी लक्ष विचलित झाले तर अपघात होतो. यामुळे मोबाईल पाहून वाहन चालविणे हा गुन्हाच आहे. प्रत्येक वाहन चालकाने वैयक्तिक व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
रवींद्र कासखेडीकर
सचिव, जनआक्रोश

Web Title: Mobile, Mobile on the Uber's Wind screen: Vehicles that drive Google Maps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.