माेटरसायकलसह माेबाईल फाेन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:29+5:302021-07-25T04:08:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : रमेश मंगू दापूरकर (६०, रा. खापरखेडा, ता. सावनेर) यांच्या घरी साेमवारी (दि. १९) झालेल्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : रमेश मंगू दापूरकर (६०, रा. खापरखेडा, ता. सावनेर) यांच्या घरी साेमवारी (दि. १९) झालेल्या चाेरीप्रकरणात खापरखेडा पाेलिसांनी दाेन विधीसंघर्षग्रस्त बालकांना शनिवारी (दि. २४) दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून माेटरसायकल, माेबाईल फाेन व राेख रक्कम जप्त केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत काळे यांनी दिली.
रमेश दापूरकर यांच्या घरातून २० हजार रुपयांची माेटरसायकल, आठ हजार रुपयांचा माेबाईल फाेन आणि आठ हजार रुपये राेख असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज चाेरीला गेला हाेता. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३८०अन्वये गुन्हा नाेंदवून प्रकरण तपासास घेतले. पाेलिसांचे पथक शनिवारी वलनी (ता. खापरखेडा) परिसरात गस्तीवर असताना त्यांना दाेन मुले विना क्रमांकाच्या माेटरसायकलवर फिरताना आढळून आली. पाेलिसांना पाहताच त्यांनी पळ काढल्याने संशय बळावला. त्यामुळे पाेलिसांनी पाठलाग करून दाेघांनाही ताब्यात घेतले. दाेघेही १७ वर्षाचे असून, ते अनुक्रमे वाॅर्ड क्रमांक-३, चनकापूर, ता. सावनेर व पाकिस्तान माेहल्ला, चनकापूर, ता. सावनेर येथे राहणारे असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले.
चाैकशीदरम्यान दाेघांनीही त्यांच्याकडे असलेली माेटरसायकल चाेरीची असल्याचे तसेच ती रमेश दापूरकर यांच्या घरून चाेरून नेल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी त्यांंच्याकडून माेटरसायकल, माेबाईल फाेन व राेख रक्कम जप्त केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत काळे यांनी दिली. ही कारवाई पाेलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत काळे, पाेलीस हवालदार उमेश ठाकरे, आशिष भुरे, प्रमाेद भाेयर, नुमान शेख, राजू भाेयर यांच्या पथकाने केली.