११ महिन्यांनी सापडला मोबाईल चोर, साथीदार मर्डरमध्ये तुरुंगात

By दयानंद पाईकराव | Published: June 28, 2024 04:44 PM2024-06-28T16:44:35+5:302024-06-28T16:46:26+5:30

बेलतरोडी पोलिसांची कामगिरी : तुरुंगातून ताब्यात घेऊन करणार चौकशी

Mobile thief found after 11 months, accomplice in jail in murder | ११ महिन्यांनी सापडला मोबाईल चोर, साथीदार मर्डरमध्ये तुरुंगात

Mobile thief found after 11 months, accomplice in jail in murder

नागपूर : घरासमोर पायदळ फिरत असलेल्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला बेलतरोडी पोलिसांनी गजाआड केले आहे. तर आरोपीचा साथीदार मागील ११ महिन्यांपासून खून केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असून त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार आहे.

पवन राजेश आर्या उर्फ पवन गोपाल मिसाळ (२०, रा. मनिषनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अमन नागेश चौहान (२०, रा. महाकालीनगर झोपडपट्टी) असे खूनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव आहे. आॅगस्ट २०२३ मध्ये खून केल्यामुळे तेंव्हापासून तो तुरुंगात आहे. २२ जुले २०२३ रोजी रात्री ८.३० वाजता अनिकेत राजेश मंदरे (२४, रा. नगर विकास सोसायटी, नरेंद्रनगर) हे आपल्या घरासमोर पायदळ फिरत असताना मोबाईलवर बोलत होते. तेवढ्यात पल्सरवर आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज काकडे, श्रीकांत गोरडे, राजेश घुगे, सुहास शिंगणे, सुमेंद्र बोपचे, अंकुश चौधरी यांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून त्यांनी बुधवारी २६ जून २०२४ रोजी रात्री १० वाजता आरोपी पवनला ताब्यात घेतले. आरोपी पवनने आपला साथीदार अमनसोबत मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पवनचा साथीदार अमन खुनाच्या घटनेत तुरुंगात शिक्षा भोगत असून त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मकुंद कवाडे यांनी दिली.

Web Title: Mobile thief found after 11 months, accomplice in jail in murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.