मोबाईल टॉवरचा मेकॅनिक आहे हॅकर्स टोळीचा प्रमुख ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:18+5:302021-07-08T04:07:18+5:30

नागपूर : एसबीआयचे एटीएम हॅक करून रक्कम उडविणाऱ्या हरियाणा टोळीचा सूत्रधार मोबाईल टॉवरचा मेकॅनिक आहे. मोबाईल टॉवर लावण्याच्या आड ...

Mobile tower mechanic is the leader of the hackers gang () | मोबाईल टॉवरचा मेकॅनिक आहे हॅकर्स टोळीचा प्रमुख ()

मोबाईल टॉवरचा मेकॅनिक आहे हॅकर्स टोळीचा प्रमुख ()

Next

नागपूर : एसबीआयचे एटीएम हॅक करून रक्कम उडविणाऱ्या हरियाणा टोळीचा सूत्रधार मोबाईल टॉवरचा मेकॅनिक आहे. मोबाईल टॉवर लावण्याच्या आड तो एटीएम हॅक करून रक्कम उडवित होता, त्याने अनेक शहरांत एटीएम हॅक केले आहेत.

एटीएम हॅक करणाऱ्या आरोपीच्या अटकेनंतर त्याच्या टोळीचा पत्ता लागणार आहे. या टोळीने शहरात चार घटना घडवून ६.७५ लाख रुपये उडविले आहेत. अटक झालेल्या आरोपीत अनिस खान अब्दुल गफ्फूर खान (२६), मो. तालीब मो. उमर (२३, रा. परवल, हरियाणा) यांचा समावेश आहे. टोळीचा सूत्रधार इकबाल पंछी खान फरार आहे. १४ ते १६ जूनदरम्यान बजाजनगर, लकडगंज आणि गणेशपेठ ठाण्याच्या परिसरात चार एटीएममधून ६.७५ लाख रुपये उडविण्यात आले होते. चारही घटनांत एसबीआयच्या एका विशेष कंपनीच्या एटीएमला टार्गेट करण्यात आले होते. एकाच वेळी अनेकदा ट्रान्झॅक्शन करून पैसे काढण्यात आले होते. पैसे मिळाल्यानंतरही एटीएमवर ट्रान्झॅक्शन फेलचा मॅसेज येत होता. यामुळे एटीएमधारकांच्या खात्यात ट्रान्झॅक्शनची नोंद होत नव्हती. एटीएममध्ये रक्कम जमा करताना कमी रक्कम मिळाल्यामुळे बँकेला याची माहिती कळली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. देशातील इतर शहरांतही अशाच घटना घडल्यामुळे पोलीस आणि बँक अधिकारी चिंतेत होते. त्यांना आरोपी पकडला जाईपर्यंत चिंता वाटत होती. झोन एकचे पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजस्थान पासिंगची कार आढळली. क्रमांक आणि फास्ट टॅगनुसार ती कार हरियाणा येथील मालकाची असल्याची माहिती समोर आली. तपासात सूत्रधार इकबाल खानचे नाव पुढे आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. बजाजनगर ठाण्याच्या पथकाला हरियाणाला पाठविण्यात आले. त्यांना सलून संचालक मो. तालिबच्या नावावर जारी एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्ड वापरल्याचे समजले. त्याच्या आधारे पोलिसांनी तालिब आणि हॉटेल संचालक अनिसला अटक केली. दरम्यान, सूत्रधार इकबाल फरार झाला. पोलीस गुरुवारी अनिस आणि तालिबसोबत नागपूरला येत आहेत. त्यांच्याकडून कार जप्त करण्यात आली आहे. दोघेही लॉकडाऊनमुळे आर्थिक टंचाईचा सामना करीत होते. त्यामुळे ते इकबालसोबत जोडले गेले. अनिल आणि इकबालने घटना घडविली. इकबाल मोबाईल टॉवर लावण्याचे काम करतो. या कामाच्या आड तो एटीएमचा शोध घेतो. त्यानंतर घटना घडवून आणतो. ही कारवाई पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शुभांगी देशमुख, उपनिरीक्षक शीतल राणे, दीपिका दानोडे, वैभव यादव आणि अश्विन चौधरी यांनी पार पाडली.

...............

तीन सेकंदात उडवित होते रक्कम

आरोपी विशेष कंपनीच्या कॅश डिपॉझिट मशीनला निशाणा बनवित होते. रुपये बास्केटमध्ये येण्यापूर्वीच ते शटरला थांबवित होते. रुपये मशीनमधून येताच आरोपी ते उचलत होते. ही घटना ते फक्त तीन सेकंदात घडवून आणत होते, असे सांगण्यात येत आहे. आरोपींची चौकशी केल्यानंतर खरी माहिती पुढे येऊ शकते. पोलीस आयुक्तांनी पोलिसांच्या पथकाला तपासासाठी ५० हजारांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे.

.............

Web Title: Mobile tower mechanic is the leader of the hackers gang ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.