नागपुरात गुन्हेगारांच्या तीन मोठ्या टोळ्यांवर मोक्का कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 13:09 IST2022-01-25T13:03:55+5:302022-01-25T13:09:54+5:30
नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांच्या तीन मोठ्या टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली.

नागपुरात गुन्हेगारांच्या तीन मोठ्या टोळ्यांवर मोक्का कारवाई
नागपूर : शहर पोलिसांनी आज एकाच वेळी गुन्हेगारांच्या तीन मोठ्या टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली.
यात मेडिकलला ऍडमिशन करून देण्याची थाप मारून अनेक पालकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या चंद्रशेखर आत्राम याच्या टोळीचा, नागपूरसह देशातील विविध महानगरात दरोडे घालणारा आंतरराज्यिय गुन्हेगार चंगीराम गोसावी तसेच मध्य भारतात अमली पदार्थाचे मोठे नेटवर्क चालवणारा कुख्यात आबू खान याच्या टोळीचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, मेडिकलला ऍडमिशन करून देण्याची थाप मारून पालकांकडून लाखो रुपये उकळणारी टोळी नागपूरमध्ये सक्रिय असल्याची वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेचा आधार घेत पोलिसांनी या टोळी छडा लावला आणि कारवाई केली होती.