पुन्हा पाच दिवस मध्यम ते मुसळधारचा अंदाज; पारा ६.९ अंशाने घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 09:23 PM2023-07-11T21:23:22+5:302023-07-11T21:23:44+5:30

Nagpur News नागपूरसह विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण असून, पुढचे ५ दिवस मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Moderate to heavy rain forecast again for five days; The mercury fell by 6.9 degrees | पुन्हा पाच दिवस मध्यम ते मुसळधारचा अंदाज; पारा ६.९ अंशाने घसरला

पुन्हा पाच दिवस मध्यम ते मुसळधारचा अंदाज; पारा ६.९ अंशाने घसरला

googlenewsNext

नागपूर : नागपूरसह विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण असून, पुढचे ५ दिवस मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मंगळवारी सकाळपासून तसे वातावरणही हाेते; पण हजेरी मात्र नगण्यच लागली. या वातावरणामुळे दिवसाचा पारा मात्र सर्वत्र ६ ते ८ अंशाच्या माेठ्या फरकाने घसरला आहे.

साेमवारच्या रात्री विदर्भातील काही जिल्ह्यांत सुसाट हजेरी लागली. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत चंद्रपुरात ८४.४ मि.मी., ब्रह्मपुरीत ४१.६, तर गडचिराेलीत ४८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. वर्धा व यवतमाळमध्ये रिमझिमने भिजविले. नागपुरातही रात्रीपासून काळ्या ढगांचीच गर्दी हाेती. मंगळवारी सकाळपासून रिमझिम सुरू झाली. मात्र, याचे चांगल्या सरीत रूपांतर झाले नाही. दिवसभर उघडझाप करीत रिपरिप सुरू हाेती. त्यामुळे दिवसभर ४ मि.मी. नगण्य पावसाची नाेंद झाली. अमरावती व वर्ध्यालाही हलक्या सरी बरसल्या.

पाऊस व आर्द्रतायुक्त ढगाळ वातावरणामुळे पारा माेठ्या फरकाने घसरला. नागपुरात २४ तासांत ६.९ अंश, तर चंद्रपुरात ८ अंशांनी घसरण झाली. इतर सर्व जिल्ह्यांत पारा घसरल्याने थंडावा पसरला.

विदर्भात पावसाची तूट मात्र अद्यापही ३१ टक्क्यांवर आहे. नागपूर, भंडारा, गाेंदियात तूट कमी असली तरी पावसाचे असमान वितरण चिंताजनक आहे. आता १७ जुलैपर्यंत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे; पण अंदाज कितपत खरा ठरताे, ते येणारा काळच सांगेल.

Web Title: Moderate to heavy rain forecast again for five days; The mercury fell by 6.9 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस