मॉडर्न आर्टला शिशिरने दिला नवा आयाम

By admin | Published: October 28, 2014 12:28 AM2014-10-28T00:28:05+5:302014-10-28T00:28:05+5:30

हुबेहूब चित्र साकारणे म्हणजे कला नव्हे तर त्यात वेगळेपण निर्माण करणे आणि पाहणाऱ्याला विचार करण्यास भाग पाडणे म्हणजे मॉडर्न आर्ट. अशाच मॉर्डन आर्टला नवा आयाम देण्याचा प्रयत्न नाशिकचा युवा

Modern dimension of shirts to modern art | मॉडर्न आर्टला शिशिरने दिला नवा आयाम

मॉडर्न आर्टला शिशिरने दिला नवा आयाम

Next

बर्लिनवरून निमंत्रण : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाला केले बोलते
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
हुबेहूब चित्र साकारणे म्हणजे कला नव्हे तर त्यात वेगळेपण निर्माण करणे आणि पाहणाऱ्याला विचार करण्यास भाग पाडणे म्हणजे मॉडर्न आर्ट. अशाच मॉर्डन आर्टला नवा आयाम देण्याचा प्रयत्न नाशिकचा युवा चित्रकार शिशिर शिंदे करीत आहे. त्याने साकारलेल्या चित्रांमुळे दिल्लीचे महाराष्ट्र सदन बोलके झाले असून त्याच्या चित्रांचे बर्लिन येथे लवकरच प्रदर्शन भरविले जाणार आहे.
एका चित्रात हजार शब्दांचे सामर्थ्य असते. एखादे चित्र पाहिले की, काहीही सांगावे लागत नाही. सर्व काही आपोआप उमजते. अशा या कलेच्या क्षेत्रात नाशिकच्या एका तरुणाने स्वत:ला झोकून दिले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रकार म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यवतमाळला आला असता त्याने मॉडर्न आर्ट आणि इतर चित्रशैलींबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. चित्रकारितेचा आजवरचा संपूर्ण प्रवास त्याने कथन केला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दीडशे चित्र साकारले. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि पर्यटनाचे प्रतिबिंब उमटविणारे ते चित्र बघून महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही शिशिरचे कौतुक केले. सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यावेळी मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट बोर्डाने सचिनला सोने किंवा चांदीची बॅट देण्याचा निर्णय घेतला. मात्र सचिनने त्याला नकार दिला. त्याऐवजी सुंदर चित्राला पसंती दिली. त्यासाठी देशातील ७०० चित्रकारांनी वेगवेगळे चित्र पाठविले. त्यात शिशिरचे चित्र निवडले गेले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या हस्ते सचिनला हे चित्र प्रदान करण्यात आले. तो आपल्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता असे शिशिर म्हणाला. मुंबई, पुणे, दुबई, फ्रान्स येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शन झाले आले. लवकरच बर्लिन येथेही त्याचे चित्रप्रदर्शन भरविले जाणार आहे. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर आत्मविश्वास बाळगून मनापासून काम करा, असा संदेश त्याने शेवटी युवकांना दिला.
खासदार विजय दर्डांना चित्र भेट
यवतमाळात आला असता शिशिरने लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांना स्वत:ची एक चित्रकृती भेट दिली. चित्रकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले ते चित्र आणि त्याची चित्रकलेतील साधना पाहून खासदार दर्डा यांनी त्याचे कौतुक केले.

Web Title: Modern dimension of shirts to modern art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.