मोतीबाग वर्कशॉपमध्ये धूळ खाताहेत आधुनिक मशीन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:09 AM2021-01-16T04:09:39+5:302021-01-16T04:09:39+5:30
कोचची देखभाल, व्हील शॉपच्या कामात येऊ शकते गती नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मोतीबाग वर्कशॉपच्या आधुनिकीकरणासाठी आणण्यात आलेल्या ...
कोचची देखभाल, व्हील शॉपच्या कामात येऊ शकते गती
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मोतीबाग वर्कशॉपच्या आधुनिकीकरणासाठी आणण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मशीन दोन वर्षांपासून धूळखात आहेत. शेडच्या विस्ताराचे काम कासवगतीने सुरू असून या मशीनचा उपयोग करण्यात येत नाही.
मोतीबाग वर्कशॉपमधील या मशीनमध्ये फास्केटिंग प्लॉट, ईटीपी, मोठ्या क्रेन सारख्या ६८ मशीन आहेत. यापैकी सरफेस व्हील लेथ, व्हिल प्रेस, एक्सेल टर्निंग मशिन आणि ड्रिलिंग मशीनची स्थापना करण्यात आली. मशीन उपलब्ध असूनही बहुतांश मशीनचा उपयोग होत नसल्यामुळे वर्कशॉपमधून अपेक्षित उत्पादन होत नाही. कंत्राट दिलेली कंपनी आधुनिकीकरणाची थट्टा उडवित आहे. उल्लेखनीय म्हणजे देशात मध्य भारतात मोतीबाग वर्कशॉप ऐतिहासिक आहे. १८६९ मध्ये तयार झालेल्या या वर्कशॉपमध्ये नोव्हेंबर २०१९ पर्यंत नॅरोगेज रेल्वेगाड्यांची देखभाल होत होती. २०१४ पासून येथे ब्रॉडगेज कोचची देखभाल सुरू झाली आहे. नुकतीच येथे एलएचबी कोचची देखभाल करण्यात आली. परंतु अशा आधुनिक कोचला येथे कमी प्रमाणात देखभालीसाठी आणण्यात येत आहे. त्यासाठी शेड तयार नसून आधुनिक मशीन पूर्णपणे स्थापन करण्यात आलेल्या नाहीत.
...........