गुढीपाडव्याला मोदी, भागवत एका मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 07:41 IST2025-03-18T07:41:25+5:302025-03-18T07:41:50+5:30
गुढीपाडव्याच्या दिवशी, ३० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

गुढीपाडव्याला मोदी, भागवत एका मंचावर
नागपूर : गुढीपाडव्याच्या दिवशी, ३० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. माधव नेत्रालयाच्या विस्तारीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजनाला दोघेही उपस्थित राहणार आहेत.
माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरची नवीन इमारत हिंगणा रोडवर प्रस्तावित आहे. गुढीपाडव्याला सकाळी १० वाजता नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. मोहन भागवत असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी गोविंददेवगिरी महाराज हेदेखील उपस्थित राहतील.