मोदी सरकार देश तोडायला निघाले आहे, अबू आझमींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 01:45 PM2019-12-16T13:45:42+5:302019-12-16T14:13:44+5:30
'शरद बोबडे यांची निवड ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब'
नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर विनायक दामोदर सावरकरांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद आज राज्याच्या विधानसभेत उमटले.
यातच, नरेंद्र मोदी सरकार देश तोडायला निघाले असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विधान भवनासमोर केला. तसेच, अबू आझमी यांनी सभागृहाबाहेर येऊन फलक झळकावले. त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख उपस्थित होते.
देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी शरद बोबडे यांची निवड यांची नियुक्ती झाल्याबद्दल अबू आझमी आनंद व्यक्त केला. शरद बोबडे यांची निवड ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत अबू आझमी यांनी "हा महाराष्ट्र सर्वधर्म समभाव जोपासणारा आहे. मात्र असे असले तरी जे स्वतःचे घर चालू शकत नाही ते आता देश चालवायला निघाले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे.
याचबरोबर, अमित शहा यांचे नाव न घेता ते म्हणाले, जे तडीपार आहेत ते आता या देशाचे गृहमंत्री आहेत. भारताचे दोन तुकड्यात विभाजन करण्याचे षड्यंत्र देशामध्ये रचले जात आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. देशामध्ये नॉन को-ऑपरेशन कॅब चालवू असा इशारा सुद्धा यावेळी अबू आझमी यांनी दिला.