मोदींनी आता दलित मतांचा विचारही करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:27 AM2018-05-30T01:27:58+5:302018-05-30T01:28:10+5:30

२०१९ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित मतांचा विचारही करू नये. कारण जोवर मी जिवंत आहे दलितांचे एकही मत मोदी किंवा भाजपला मिळू देणार नसल्याचे वक्तव्य गुजरातमधील काँग्रेस समर्थित आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले.

Modi should not even think of Dalit votes | मोदींनी आता दलित मतांचा विचारही करू नये

मोदींनी आता दलित मतांचा विचारही करू नये

Next
ठळक मुद्देजिग्नेश मेवानी : संयुक्त नेतृत्वाची आघाडी पुढे जाईल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१९ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित मतांचा विचारही करू नये. कारण जोवर मी जिवंत आहे दलितांचे एकही मत मोदी किंवा भाजपला मिळू देणार नसल्याचे वक्तव्य गुजरातमधील काँग्रेस समर्थित आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले.
रिपब्लिकन युथ फेडरेशन व रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अमृत भवन येथे मानव अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला उद्घाटक म्हणून आमदार जिग्नेश मेवानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बबनराव तायवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून रमेश जीवने, श्याम काळे, गुरुप्रीत सिंग, नीलेश देशभ्रतार, प्रतीक डोर्लीकर, अमित भालेराव उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनीय भाषणात बोलताना जिग्नेश मेवानी म्हणाले की, येत्या राजस्थान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील किमान एक लाख दलितांना भाजपला मतदान न करण्याची शपथ देणार आहे. हाच प्रयत्न महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात करणार आहे. मोदी सरकारवर टीका करीत ते म्हणाले की, सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता, संविधानाच्या दृष्टीने धोकादायक स्थिती आहे. २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेवर आल्यास लोकशाही अडचणीत येईल आणि पुढे निवडणुका बंद होण्याचा धोका आहे. भाजपाला रोखले गेले नाही तर देशात मनुवाद लागू केला जाण्याचा धोका आहे. अशास्थितीत देशातील सर्वच मुख्य विरोधी पक्ष एकत्र येत असून, ते सकारात्मक चिन्ह आहे. संयुक्त नेतृत्वातील आघाडी पुढे जाईल. कार्यक्रमाचे संचालन क्षितिज गायकवाड यांनी केले.
- मोदींचा विकास हे डिझास्टर मॉडेल
मोदींचा विकास हे ‘डिझास्टर मॉडेल' आहे. इंधन, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून जनता अडचणीत आहे. रोजगार द्या, जनतेसाठी उपयोगी कामे करा, ते होत नसेल तर गादी रिकामी करा, असे मेवानी म्हणाले. मोदींनी आता दलित मतांचा
 मुखर्जींनी संघाच्या दुकानाला कुलूप लावावे
संघाच्या कार्यक्रमात जायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रणव मुखर्जी त्यांच्या कार्यक्रमात येतच असतील तर त्यांनी कुलूप सोबत आणून ते संघाच्या दुकानाला ठोकावे, अशी कोटी जिग्नेश मेवानी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. संघाच्या कार्यक्रमाला येऊन उपयोग काय, रोजगार वाढणार नाही, शेतकरी आत्महत्या कमी होणार नाहीत तरीही त्यांच्या कार्यक्रमाला जायचे की नाही, हे ज्याचे त्यांनी ठरवावे.
 बॅलेटनेच मतदान घ्या
ईव्हीएमवर जनतेत शंका आहे. मी स्वत: २० हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आलो आहे तरीही ते मशीन असल्याने गडबड करणे शक्य आहे. भाजपा आणि मोदींच्या मनात चोर नसेल तर ईव्हीएमऐवजी बॅलेटने मतदान करून बघावे, त्यात कोणतीही अडचण नाही; शिवाय त्यातून सर्वप्रकारच्या शंकाही दूर होतील, असेही मेवानी म्हणाले.

 

Web Title: Modi should not even think of Dalit votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.