मोदींच्या नेतृत्वातच महिलांच्या सशक्तीकरणाला वेग : विजया रहाटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 09:48 PM2019-10-16T21:48:07+5:302019-10-16T21:50:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले.
बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ज्याप्रमाणे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांचे सक्षमीकरण सुरू आहे, त्याच धर्तीवर महिलांच्या हितासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निर्णय घेतले जात आहेत. फडणवीस सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या. यामुळे देशातील नारीशक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे.
राज्यामध्ये भाजपा २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावा त्यांनी यावेळी के ला. महिलांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तम कार्य केले. महिलांसाठी विशेष औद्योगिक धोरण देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. यासाठी ५० औद्योगिक क्षेत्रांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातील. देशभरातील आठ कोटी महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला, महाराष्ट्रात एक कोटी महिलांना याचा लाभ झाला आहे. सॅनिटरी पॅड योजनासुद्धा यशस्वी आणि लोकप्रिय ठरली. मुद्रा योजना, माझी कन्या भाग्यश्री, हिरकणी यासारख्या योजनांतून वाव दिल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर आणि कीर्तिदा अजमेरा उपस्थित होत्या.