नागपुरात ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:04 PM2018-11-16T22:04:57+5:302018-11-16T22:05:45+5:30

ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा (वय २८) मोबाईल फोडून तिला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Molestation of break up girlfriends booked in Nagpur | नागपुरात ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा विनयभंग

नागपुरात ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा विनयभंग

Next
ठळक मुद्देफोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा (वय २८) मोबाईल फोडून तिला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नितीन मोहनराव गवई (वय ३४) असे आरोपीचे नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव (ता. देवळी) येथील रहिवासी होता.
तक्रारदार महिला अजनीत राहते. तिचे आणि नितीनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. काही दिवसांपूर्वी या संबंधात वितुष्ट आल्यापासून महिला त्याला टाळत आहे. त्यामुळे तो तिचा पाठलाग करून, तिला रस्त्यात अडवून तिच्याशी सलगी साधण्याचे प्रयत्न करतो. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ती रस्त्याने जात असताना आरोपी नितीनने तिला अडवले. तिला शिवीगाळ करून तिचा मोबाईल हिसकावून घेतला. तो रस्त्यावर फोडून त्याने तिला तिच्यासोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिने अजनी ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंग करून धमकी देण्याच्या आरोपाखाली नितीन विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी केली जात आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी नितीन हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर बलात्कार तसेच विनयभंगाचा यापूर्वीदेखिल गुन्हा दाखल आहे. तर, फिर्यादी महिलेनेही यापूर्वी अशाच प्रकारची तक्रार दुसºयाविरुद्ध नोंदवली होती, असे पोलीस सांगतात.

 

Web Title: Molestation of break up girlfriends booked in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.