मैत्रीत कटुता निर्माण झाल्यामुळे केली छेडखानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 09:50 PM2019-09-09T21:50:02+5:302019-09-09T21:51:11+5:30
मैत्रीत कटुता निर्माण झाल्यामुळे एका विवाहित व्यक्तीने युवतीची छेडखानी केल्याची घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली आहे. आतापर्यंत तीन ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मैत्रीत कटुता निर्माण झाल्यामुळे एका विवाहित व्यक्तीने युवतीची छेडखानी केल्याची घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली आहे. आतापर्यंत तीन ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत.
गगनदीप सिंह असे आरोपीचे नाव आहे. गगनदीप ट्रान्सपोर्टर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्ती २३ वर्षीय युवती पूर्वी डीजेचे काम करीत होती. काही दिवसांपासून ती गारमेंटच्या दुकानात काम करते. तीन वर्षांपासून तिची गगनदीपशी मैत्री आहे. गगनदीप विवाहित आहे. दोघांमध्ये मैत्री होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये कटुता निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू आहे. दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाला आहे. युवतीने नंदनवन आणि सीताबर्डी ठाण्यात गगनदीपविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गगनदीपच्या विरुद्ध छेडखानी, धमकी देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर पुन्हा त्यांच्यात मैत्री झाली होती. दरम्यान युवतीची आणखी एका ट्रान्सपोर्टरच्या मुलाशी मैत्री झाली. त्यामुळे गगनदीप संतापला. त्याने ट्रान्सपोर्टरच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा दोघांचे संबंध खराब झाले. युवतीच्या तक्रारीनुसार ८ सप्टेंबरला ती घरून दुकानात जात होती. त्यावेळी गगनदीप तिला भेटला. गगनदीपने तिला आपल्या कार क्रमांक एम. एच. ४०, ए. आर-८०५५ मध्ये बस फिरायला जाऊ असे सांगितले. त्याला नकार दिला असता त्याने जबरदस्तीने तिचा हात पकडून कारमध्ये बसविले आणि लज्जास्पद वर्तन केले. युवतीने लकडगंज ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून गगनदीप फरार आहे. हे प्रकरण पोलिसांसाठी अनेक दिवसांपासून डोकेदुखीचे ठरले आहे. नंदनवन आणि सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांनाही एकमेकांपासून दूर राहण्याची तंबी दिली होती. परंतु त्यानंतरही त्यांच्यात मैत्री झाली. गगनदीपच्या मोबाईलची तपासणी केल्यास त्यांच्यातील मैत्रीची सत्यता जाणून घेतल्या जाऊ शकते. गगनदीपच्या वागणुकीत बदल न झाल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी घटना घडू शकते.