नागपूरच्या कथावाचिकेवर वृंदावनमध्ये अतिप्रसंग : आश्रमातील महंतानेच केले दुष्कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 12:08 AM2020-10-29T00:08:18+5:302020-10-29T00:09:33+5:30
Molestation by mahant in ashram, crime news nagpur नागपुरातील युवा कथावाचिका उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे एका महंताद्वारे केलेल्या दुष्कृत्याला बळी पडली आहे. नागपुरात पोहोचल्यानंतर तरुणीने महंत दिनबंधू दास महाराज याच्याविरोधात तहसील ठाण्यात तक्रार नोंदविली असून, प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस अत्यंत गोपनीय पद्धतीने हाताळत आहेत.
तहसील ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील युवा कथावाचिका उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे एका महंताद्वारे केलेल्या दुष्कृत्याला बळी पडली आहे. नागपुरात पोहोचल्यानंतर तरुणीने महंत दिनबंधू दास महाराज याच्याविरोधात तहसील ठाण्यात तक्रार नोंदविली असून, प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस अत्यंत गोपनीय पद्धतीने हाताळत आहेत.
पीडित तरुणी भागवत कथा वाचनासाठी देशभरात भ्रमंती करत असते. जून महिन्यात पीडितेची ओळख सोशल मीडियाद्वारे ४० वर्षीय आरोपी दिनबंधू दासशी झाली. पीडिता मातीची भांडी बनविणारी कलाकारही आहे. याच कलेसंदर्भात पीडितेची भेट दिनबंधूशी झाली. त्यानंतर दिनबंधू सातत्याने पीडितेशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्कात होता. कथा वाचिकेला संस्कृतमध्ये आचार्य पदवी प्राप्त करायची होती. नातेवाईकाच्या सिफारशीवरून तिने मथुरा येथील वृंदावनमध्ये एका संस्कृत महाविद्यालयात प्रवेश घेतला. ५ ऑक्टोबरला पीडिता आपल्या आईसोबत वृंदावनला गेली. वृंदावनमध्ये दिनबंधू दास यानेच पीडिता व तिच्या आईच्या राहण्याची व्यवस्था आश्रमात केली. ६ ऑक्टोबरला दिनबंधू दासच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर रात्री ९ वाजता ती आपल्या आईसोबत आश्रमात आली. ७ ऑक्टोबरला रात्री दिनबंधू दासने पीडितेला रात्री १२ वाजता अर्ध्या तासासाठी आपल्या खोलीत बोलावले. मात्र, कथा वाचिकेने नकार देत ही बाब आईला सांगितली. ८ ऑक्टोबरला दिनबंधूने अस्थमाचा अटॅक आल्याची बतावणी करत कथा वाचिकेला मदतीसाठी खोलीत बोलावले. मदतीसाठी गेली असता दिनबंधूने पीडितेवर जबरी अतिप्रसंग केला. लग्नाचे आमिष दाखवत घटनेची वाच्यता कुठेही न करण्याची ताकिद त्याने पीडितेला दिली. या घटनेनंतर कथा वाचिका आणि तिच्या आईने आश्रम सोडला आणि चित्रकूटला रवाना झाले. तेथून नागपूरला परतल्यावर त्यांनी घटनेची माहिती नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. कथा वाचिकेच्या तक्रारीवर तहसील पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनास्थळ वृंदावन असल्याने संंबंधित कारवाईचे कागदपत्रे वृंदावन येथील कोतवाली ठाण्यात पाठविण्यात आले आहेत.