अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:57+5:302021-04-14T04:08:57+5:30
उमरेड : औषधे खरेदी करण्यासाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला लज्जा निर्माण हाेईल, अशा शब्दात शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करण्यात ...
उमरेड : औषधे खरेदी करण्यासाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला लज्जा निर्माण हाेईल, अशा शब्दात शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करण्यात आला. ही उमरेड शहरालगतच्या वेकाेलि काॅलनीत रविवारी (दि. ११) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली असून, पाेलिसांनी चाैघांविरुद्ध गुन्हा नाेंदविला. मात्र, कुणालाही अटक केली नाही.
कुणाल दास, इमामूल मन्सुरी, पिंटू चव्हाण आणि मिंटू चंदेल चाैघेही रा. वेकोलि कॉलनी, उमरेड अशी आराेपींची नावे आहेत. पीडित अल्पवयील मुलगी मित्रासाेबत औषधे खरेदी करण्यासाठी जात हाेती. वाटेत या चाैघांनी तिला मनात लज्जा निर्माण हाेईल अशी शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला व तिला धमकही दिली. त्यामुळे तिने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि ३५४ (अ), ५०४, ५०६, पाेक्साे सहकलम १२ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली. वृत्त लिहिस्ताे आराेपींना अटक करण्यात आली नव्हती. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक मीरा मटाले करीत आहेत.