अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीला चार वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:30 PM2018-03-14T22:30:24+5:302018-03-14T22:30:39+5:30
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
भीमराव व्यंकटराव गजभिये (५४) असे आरोपीचे नाव असून तो पांढराबोडी येथील रहिवासी व व्यवसायाने आॅटोरिक्षा चालक आहे. १३ एप्रिल २०१६ रोजी तो पीडित मुलीला शाळेत सोडून देत होता. दरम्यान, त्याने मुलीचा विनयभंग केला. त्यावेळी पीडित मुलगी १२ वर्षे वयाची होती. तक्रारीनंतर सीताबर्डी पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला १४ एप्रिल रोजी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एम. एच. वाघाडे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. वर्षा आगलावे यांनी बाजू मांडली.