नागपुरात स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे : दारूच्या नशेत धुंद होता ड्रायव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 09:59 PM2019-07-10T21:59:26+5:302019-07-10T22:00:35+5:30

मंगळवारी एका स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडल्या गेलेला चालक दारूच्या नशेत धुंद होता. नशेतच तो स्कूल व्हॅन चालवित होता. यामुळे व्हॅनने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात होता. तसेच स्कूल व्हॅनवर नजर ठेवणाऱ्या शासकीय विभागांचा निष्काळजीपणाही यातून उघडकीस आला आहे.

Molestation in school van at Nagpur, driver was in drunk condition | नागपुरात स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे : दारूच्या नशेत धुंद होता ड्रायव्हर

नागपुरात स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे : दारूच्या नशेत धुंद होता ड्रायव्हर

Next
ठळक मुद्देप्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी एका स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडल्या गेलेला चालक दारूच्या नशेत धुंद होता. नशेतच तो स्कूल व्हॅन चालवित होता. यामुळे व्हॅनने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात होता. तसेच स्कूल व्हॅनवर नजर ठेवणाऱ्या शासकीय विभागांचा निष्काळजीपणाही यातून उघडकीस आला आहे.
मंगळवारी दुपारी इमामवाडा पोलीस ठाण्यासमोर ३० वर्षीय आरोपी आशिष मनोहर वर्मा याला स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. नागरिकांनी आरोपीला चांगला चोप दिला. ऐन वेळेवर पोलिसांनी येऊन त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडवले. त्यामुळे त्याचा जीव वाचू शकला. पोलिसांना संशय आहे की, आरोपीने इतर मुलींसोबतही अशाच प्रकारचे कृत्य केले असावे. त्याला आज न्यायालयासमोर सादर करून न्यायिक तुरुंगात पाठवण्यात आले.
आशिष गेल्या ८-९ वर्षांपासून स्कूल व्हॅन चालवित आहे. पीडित मुलगी आणि तिचा पाच वर्षाचा भाऊ त्याच्या व्हॅनमधून शाळेत ये-जा करतात. असे सांगितले जाते की, मंगळवारी सकाळपासूनच आरोपी दारूच्या नशेत धुंद होता. दुपारी ३.३० वाजता व्हॅनमध्ये स्वार इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर पीडित मुलगी व तिच्या भवाला घेऊन तो इमामवाड्यात आला. त्याने इमामवडा ठाण्यजवळील टिंबर मार्केटजवळ व्हॅन उभी केली. त्याने मुलीच्या भवाला ५० रुपये देऊन समोसे व कुरकुरे आणायला सांगितले. तो गेल्यानंतर त्याने मुलीला मागच्या सीटवर नेले आणि तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. दरम्यान रस्त्याने जात असलेल्या एका तरुणीची व्हॅनवर नजर गेली. तिला संशय आल्याने ती व्हॅनजवळ गेली तेव्हा आशिष दिसला. तिने आरडाओरड करून लोकांना बोलावले. तेव्हा आशिषचे कृत्य उघडकीस आले. नागरिकांनी त्याला चांगले झोडपले. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
दारूच्या नशेत धुंद हेता डायव्हर
जिवंत जाळण्याचा प्रयत्न
आशिषच्या कृत्यामुळे नगारिकांमध्ये इतका प्रचंड रोष होता की, त्यांनी त्याचे केस ओढून त्याला जिवंत जाळण्याची तयारी केली होती. लोकांचे म्हणणे होते की, अशा गुन्हेगारांना जिवंत सोडायलाच नको. नागरिकांचा संताप पाहून पोलिसही हादरले होते. त्यांनी संयमाने काम घेऊन नागरिकांच्या तावडीतून आरोपीला सोडविले.
--- तर माहितही पडले नसते
आरोपी आशिष नशेत इतका धुंद होता की, त्याने ज्या ठिकाणी व्हॅन उभी केली होती, तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आणि वर्दळीचा रस्ता असल्याचेही त्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळेच तरुणीची त्याच्यावर नजर गेली. हेच कृत्य दुसऱ्या ठिकाणी झाले असते तर कदाचित माहितही पडले नसते.

 

Web Title: Molestation in school van at Nagpur, driver was in drunk condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.