एलेक्सीसमध्ये रुग्ण महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:34+5:302021-06-21T04:07:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सिटी स्कॅनसाठी स्ट्रेचरवर नेताना एलेक्सीस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने नको त्या ठिकाणी हात लावून विनयभंग केला, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सिटी स्कॅनसाठी स्ट्रेचरवर नेताना एलेक्सीस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने नको त्या ठिकाणी हात लावून विनयभंग केला, अशी तक्रार ३९ वर्षीय महिलेने केली. तक्रार करणारी महिला शनिवारी सायंकाळी चक्कर आल्याने एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली. तिला डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे वाॅर्ड बॉयने तिला स्ट्रेचरवर घेतले. खाली उतरवताना महेश मधुकर घोडमारे (वय ३९) नामक आरोपीने तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. यामुळे महिलेने मानकापूर ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी तिच्या तक्रारीवरून घोडमारेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. चाैकशीत त्याने विनयभंगाच्या आरोपाचा इन्कार केला आहे. रुग्ण चढवत, उतरवत असताना कुठे चुकून हात लागला असेल, असे तो म्हणतो.
---
जरीपटक्यात युवतीचा विनयभंग
नागपूर - जरीपटक्यातील एका १८ वर्षाच्या युवतीला घरी नेऊन अश्लील शिवीगाळ करणारा आरोपी बादल पाटील (वय २४) याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
---