नागपुरात सतरंजीपुऱ्याला मागे सोडू शकतो मोमिनपुरा; रस्त्यांना आले बाजाराचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:13 PM2020-04-30T12:13:25+5:302020-04-30T12:13:46+5:30

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सरकार व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जबाबदार सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरू, बुद्धिजीवी लोक लोकांना आपापल्या घरांमध्ये राहण्याचे आवाहन करीत आहेत. यानंतरही निष्काळजीपणा दिसून येत आहे.

Mominpura can leave Sataranjipura behind; market on streets | नागपुरात सतरंजीपुऱ्याला मागे सोडू शकतो मोमिनपुरा; रस्त्यांना आले बाजाराचे स्वरूप

नागपुरात सतरंजीपुऱ्याला मागे सोडू शकतो मोमिनपुरा; रस्त्यांना आले बाजाराचे स्वरूप

Next
ठळक मुद्देमुस्लिम फुटबॉल ग्राऊंडवर लागतोय बाजार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सरकार व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जबाबदार सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरू, बुद्धिजीवी लोक लोकांना आपापल्या घरांमध्ये राहण्याचे आवाहन करीत आहेत. यानंतरही निष्काळजीपणा दिसून येत आहे. या निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असाच निष्काळजीपणा मोमिनपुºयातही दिसून येत आहे. येथील परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाच्या बाबतीत मोमिनपुरा सतरंजीपुºयालाही मागे सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोमिनपुरा येथील मुस्लिम फुटबॉल ग्राऊंडवर दररोज बाजार लागत आहे. येथे दुकानांची संख्या आणि लोकांच्या गर्दीमुळे ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवणे कठीण झाले आहे. यासोबतच अंसारनगर-सैफीनगर रोडवर नेहमीच असे चित्र दिसून येते. येथील लहान-मोठ्या रस्त्यांच्या बाजूला दुकाने लावली जात आहे. त्यामुळे येथे फिजिकल डिस्टंसिंग ठेवून पायी चालणेही कठीण झाले आहे. कब्रस्तान रोडवरही मार्केटसारखी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे मोमिनपुरा येथील हे मार्केट प्रशासनाच्या देखरेखीमध्ये लावले जात आहे. फळ विक्री, भाजी विक्री, दुकाने यांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे. प्रशासनानेच ही जागा उपलब्ध करून दिल्याचेही येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. परंतु जे नियम प्रशासनाने घातले आहेत, त्याचे काय? कोरोना रुग्णांच्याबाबतीत सध्या सतरंजीपुरा परिसर आघाडीवर आहे. परंतु मोमिनपुरा येथील सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण आणले नाही तर येथील परिस्थिती त्यापेक्षाही वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Mominpura can leave Sataranjipura behind; market on streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.