तक्रारकर्त्याला पैसे परतीची हमी

By admin | Published: December 31, 2016 03:04 AM2016-12-31T03:04:17+5:302016-12-31T03:04:17+5:30

नागरिकांचा विशेषत: युवकांचा आॅनलाईन खरेदी करण्याकडे कल वाढला असून

Money back guarantee to the complainant | तक्रारकर्त्याला पैसे परतीची हमी

तक्रारकर्त्याला पैसे परतीची हमी

Next

अ. भा. ग्राहक पंचायत : ‘सायबर क्राईम’वर माने यांचे मार्गदर्शन
नागपूर : नागरिकांचा विशेषत: युवकांचा आॅनलाईन खरेदी करण्याकडे कल वाढला असून फसवणुकींचेही प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आॅनलाईन खरेदीद्वारे फसवणूक झाली तर चोवीस तासाच्या आत सायबर क्राईम सेलकडे तक्रार दाखल केल्यास तक्रारकर्त्याला १०० टक्के संपूर्ण पैसे परत मिळू शकतात, असे आश्वासन सायबर क्राईमचे पोलीस उपनिरीक्षक विशाल माने यांनी येथे दिले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे ‘सायबर क्राईम’ या विषयावर चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) अश्पाक शेख, ग्राहक पंचायतचे माजी राष्ट्रीय सचिव अशोक त्रिवेदी आणि जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे उपस्थित होते.
माने म्हणाले, क्रेडिट व डेबिट कार्डवर चीप नसेल तर ते कार्ड सुरक्षित नाही. त्यामुळे नागरिकांनी चीप असलेल्या कार्डची बँकांना मागणी करावी. फोनवर येणाऱ्या आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नये. सोशल मीडिया साईटवर वैयक्तिक माहिती देऊ नये.
अश्पाक शेख म्हणाले, वाहतुकीचे नियम मोडू नये आणि हेल्मेट व सीटबेल्टशिवाय दुचाकी व चारचाकी वाहन चालवू नये.गजानन पांडे म्हणाले, क्रेडिट व डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून आॅनलाईन व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ‘सायबर क्राईम’ या विषयावर ग्राहक पंचायतच्या माध्यमातून विदर्भातील प्रत्येक तालुक्यात असे चर्चासत्र घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमात विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख विनोद देशमुख, आयटी सेल प्रमुख नरेंद्र कुळकर्णी, नागपूर महिला प्रमुख तृप्ती आकांत, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, श्रीपाद हरदास, श्रीपाद भट्टलवार, उदय दिवे, राजू पुसदेकर, ज्ञानेश्वर चौधरी, सतीश शर्मा, चंद्रशेखर ढवळे, अमर वंजारी, हरीश नायडू, संध्या पुनियानी, मुकेश गजभिये, अविनाश संगवाई, अ‍ॅड. गौरी चांद्रायण, ज्योती फडके, सुधांशू दाणी, अ‍ॅड. विलास भोसकर, डॉ. रवींद्र गुंडलवार, हरिभाऊ चौधरी, शामकांत पात्रीकर, किशोर मुटे, विलास देशपांडे, रवी सोर्इंदे, प्रकाश भुजाडे, जोगदंड आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Money back guarantee to the complainant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.