परीक्षेत पास करण्यासाठी मागितले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 08:59 PM2019-03-16T20:59:22+5:302019-03-16T21:00:48+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) नेत्ररोग विभागाच्या विभागप्रमुखांनी परीक्षेत पास होण्याकरिता पैशांची मागणी केल्याची व मानसिक त्रास दिल्याची तक्रार एका माजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) विद्यार्थ्याने अधिष्ठात्यांकडे केली आहे. या तक्रारीवर अधिष्ठात्यांनी संबंधित विभागप्रमुखांना स्पष्टीकरण मागितले आहे.

Money demanding to pass the exam | परीक्षेत पास करण्यासाठी मागितले पैसे

परीक्षेत पास करण्यासाठी मागितले पैसे

googlenewsNext
ठळक मुद्देपीजी विद्यार्थ्याचा आरोप : मेयोचे नेत्ररोग विभाग आले चर्चेत

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) नेत्ररोग विभागाच्या विभागप्रमुखांनी परीक्षेत पास होण्याकरिता पैशांची मागणी केल्याची व मानसिक त्रास दिल्याची तक्रार एका माजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) विद्यार्थ्याने अधिष्ठात्यांकडे केली आहे. या तक्रारीवर अधिष्ठात्यांनी संबंधित विभागप्रमुखांना स्पष्टीकरण मागितले आहे.
तक्रारकर्ता विद्यार्थी हा २०१३ ते २०१६ दरम्यान मेयोमध्ये होता. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याने नेत्ररोग हा विषय निवडला होता. दाखल केलेल्या त्याच्या तक्रारीनुसार, नेत्ररोग विभागाच्या प्रमुखांनी तीन वर्षांच्या कार्यकाळात मानसिक त्रास दिला. परीक्षेत पास होण्याकरिता पैशांची मागणी केली. प्रत्येक पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मानसिक व आर्थिक पिळवणूक ते करतात. मेडिकल बोर्डाच्या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार झाला आहे. लेक्चर व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे पद भरताना भ्रष्टाचार करतात. ंआंतरवासिता(इन्टर्न)मुलींना आपल्यासमोर बसवून ठेवतात. जाणीवपूर्वक शल्यचिकित्सागृह बंद ठेवण्यास लावतात. यामुळे या विभागाच्या सर्वात कमी शस्त्रक्रिया होतात. माझ्या परीक्षेच्या एक दिवसआधी परीक्षेत पास व्हायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे धमकाविले होते. या भ्रष्ट विभागप्रमुखाची चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थ्याने केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या विद्यार्थ्याने २०१६ मध्ये अशीच तक्रार मुख्य सचिव आारोग्य वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केली होती. परंतु कुठलीच कारवाई किंवा चौकशी झाली नव्हती. आता पुन्हा तक्रार अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना मेल करून केली आहे. त्यांनी तक्रारीला गंभीरतेने घेतले आहे.
 विभागप्रमुखांना मागितले स्पष्टीकरण
माजी विद्यार्थ्याची तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाच्या प्रमुखांना स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांचे स्पष्टीकरण आल्यानंतरच पुढे काही बोलता येईल.
डॉ. अजय केवलिया
अधिष्ठाता, मेयो

Web Title: Money demanding to pass the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.