अॅप डाऊनलोड करताच झाले पैसे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:11 AM2021-02-18T04:11:03+5:302021-02-18T04:11:03+5:30
नागपूर : सीमकार्ड बंद होणार असल्याचा मॅसेज मोबाईलवर पाठवून एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातील ७४ हजार रुपये उडविले. ही ...
नागपूर : सीमकार्ड बंद होणार असल्याचा मॅसेज मोबाईलवर पाठवून एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातील ७४ हजार रुपये उडविले. ही घटना सदर पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. सुरेंद्रकुमार गुरुवारा (८७) रा. उत्कर्ष शिखर अपार्टमेंट, माऊंट रोड हे ७ फेब्रुवारी रोजी आपल्या घरी होते. सकाळी त्यांच्या मोबाईलवर सीमकार्ड बंद होणार असल्याचा मॅसेज आला. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने लगेच मॅसेज आलेल्या क्रमांकावर फोन केला. एस.के. वर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर डेबिट कार्ड व खाते क्रमांक त्यात टाकण्याची सूचना केली. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या खात्यातील ७४ हजार रुपये उडविण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदविली. सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
...........