मुद्रा योजना सर्वंकष लागू करावी

By admin | Published: January 7, 2016 03:43 AM2016-01-07T03:43:57+5:302016-01-07T03:43:57+5:30

पंतप्रधान व केंद्रीय वित्तमंत्र्यांनी मुद्रा योजनेची घोषणा क रताना हे एक स्वतंत्र प्राधिकरण राहील. या अंतर्गत विविध वित्तसंस्था येतील, अशी ग्वाही दिली होती.

The money scheme should be implemented as a whole | मुद्रा योजना सर्वंकष लागू करावी

मुद्रा योजना सर्वंकष लागू करावी

Next

राष्ट्रीय संमेलनात मागणी : मार्चमध्ये काढणार रॅली
नागपूर : पंतप्रधान व केंद्रीय वित्तमंत्र्यांनी मुद्रा योजनेची घोषणा क रताना हे एक स्वतंत्र प्राधिकरण राहील. या अंतर्गत विविध वित्तसंस्था येतील, अशी ग्वाही दिली होती. याची अंमलबाजवणी करण्यासाठी संसदेच्या पुढील अधिवेनात याबाबतचे विधेयक पारित करून देशभरात मुद्रा योजना सर्वंकष लागू करण्यात यावी, अशी मागणी कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांच्यातर्फे नागपुरात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय व्यापारी संमेलनात करण्यात आली.
संमेलनात देशभरातील २०० हून अधिक व्यापारी प्रतिनिधी सहभागी झाले होते. रिटेल व्यवसायाशी संबंधित विविध मुद्यावर पुढील मार्च महिन्यात तीन दिवसीय महाअधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान दिल्ली येथे रॅली काढण्यात येणार आहे. यात देशभरातील हजारो व्यापारी सहभागी होतील.
मुद्रा योजना बँका लागू करीत आहेत. मुद्रा प्राधिकरणात विविध वित्त संस्थांचा सहभाग असून यात ट्रस्ट सोसायटी, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आदींचा समावेश केला जाईल. या संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेता येईल.
देशात तातडीने जीएसटी लागू करण्यात यावा. रिटेल व्यवसायासाठी एक राष्ट्रीय धोरण, नगदी रहित अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून डेबिट व क्रेडिट कार्डाचा वापर करण्याला प्रोत्साहन देणे, ई-कॉमर्स व थेट विक्री करता यावी यासाठी कायदा क रण्यात यावा.
मुद्रा योजना देशभरात लागू करून व्यापाऱ्यांना उत्तम बँक सुविधा उपलब्ध करणे, देशातील रिटेल व्यापाराला आधुनिक व उच्च दर्जाचे करणे आदी मुद्यावर संमेलनात चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The money scheme should be implemented as a whole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.