रामटेक शहरात माकडांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:12 AM2021-09-14T04:12:33+5:302021-09-14T04:12:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : रामटेक शहर माकडांसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात शहरात लाल व काळ्या ताेंडांच्या माकडांची संख्या ...

The monkey infestation increased in the city of Ramtek | रामटेक शहरात माकडांचा उपद्रव वाढला

रामटेक शहरात माकडांचा उपद्रव वाढला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : रामटेक शहर माकडांसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात शहरात लाल व काळ्या ताेंडांच्या माकडांची संख्या प्रचंड वाढली असून, त्याचा दिवसभर उच्छाद सुरू असताे. ही माकडे घरावरील कौले फाेडण्यापासून तर दुचाकींना लाथा मारण्यापर्यंतचे उपद्व्याप करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहरात माकडांच्या कळपांचा दिवसभर वावर असताे. ही माकडे घराच्या छतावर उड्या मारत असल्याने कौलांचे व टिनपत्र्यांचे नुकसान हाेते. ही माकडे आता बरीच धीट झाली आहेत. ते चक्क घरात शिरून भाजीपाला, कणकीचे गाेळे, पाेळ्या व इतर खाद्यपदार्थ उचलून नेतात. घरासमाेर उभ्या ठेवलेल्या दुचाकी वाहनांना लाथा मारून पाडतात. ही माकडे रात्रीला घरांच्या छतावर मुक्काम करीत असल्याने छतावर जाणे अथवा फिरणेही धाेकादायक झाले आहे.

या माकडांच्या स्थानिक नगर परिषद प्रशासन व वन विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कुणीही या तक्रारींची दखल घेत बंदाेबस्त करायला तयार नाहीत. या माकडांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. खरं तर वन विभागाने या माकडांना पकडून दूरवरच्या जंगलात साेडणे गरजेचे आहे.

...

महिलांमध्ये भीतीचे वातावरण

ही माकडे महिला व मुलांना मुळीच घाबरत नाहीत. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता ते चवताळतात. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी माकडांनी अनेकांचा चावा घेतल्याने भीतीपाेटी कुणीही त्यांना हाकलण्याची हिंमत करीत नाही. या माकडांच्या कळपांमध्ये राेज लढाई हाेत असल्यानेही नागरिकांना छतांवरील कौले व घरासमाेरील दुचाकी वाहनांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

Web Title: The monkey infestation increased in the city of Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.