कोरोना लसीचा प्रयोग स्वत:वर करून माकडे विदर्भात परतली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:18 PM2021-05-08T23:18:46+5:302021-05-08T23:20:15+5:30

The monkeys returned to Vidarbha कोरोना लसीचा रिसर्च करण्यासाठी सुमारे ६ महिन्यांपूर्वी विदर्भातून माकडे पकडून नेण्यात आली होती. त्या माकडांना लस टोचून त्यांच्यावरील रिसर्च यशस्वी झाल्यानंतर, ही माकडे पुन्हा विदर्भातील त्यांच्या मूळ अधिवासात परतली आहेत. अर्थात, त्यांना परत आणण्यात आले आहे.

The monkeys returned to Vidarbha after experimenting with the corona vaccine! | कोरोना लसीचा प्रयोग स्वत:वर करून माकडे विदर्भात परतली!

कोरोना लसीचा प्रयोग स्वत:वर करून माकडे विदर्भात परतली!

Next
ठळक मुद्देलसीच्या रिसर्चसाठी विदर्भाच्या जंगलातून नेली होती माकडं

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना लसीचा रिसर्च करण्यासाठी सुमारे ६ महिन्यांपूर्वी विदर्भातूनमाकडे पकडून नेण्यात आली होती. त्या माकडांना लस टोचून त्यांच्यावरील रिसर्च यशस्वी झाल्यानंतर, ही माकडे पुन्हा विदर्भातील त्यांच्या मूळ अधिवासात परतली आहेत. अर्थात, त्यांना परत आणण्यात आले आहे.

कोरोना संक्रमणावर उपाय म्हणून लस बनविण्याचे काम सुरू असताना, संशोधनासाठी काही माकडे विदर्भातील जंगलातून पकडून नेण्यात आली होती. राज्याच्या मुख्य वनजीव रक्षकांच्या परवानगीनंतरच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये त्यांना अगदी कडोकोट सुरक्षेत नेण्यात आले होते. तेथील वैद्यकीय कोविड १९च्या विषाणूवर संशोधन करून, लस लवकर तयार करण्यासाठी माकडांवर लसीचे प्रयोग केले. संशोधनानंतरही ही माकडं सुरक्षित आहेत. त्याच्यावरील संशोधनानंतरच लसीची सुरक्षा पटली, त्यामुळे लस आली.

ही कार्यसिद्धी झाल्याने पुणे येथील प्रयोगशाळेमधून शनिवारी काही माकडांना परत नागपुरात आणण्यात आले. त्यांच्यावरील संशोधन संपल्याने व यशस्वी झाल्याने, या माकडांना परत त्यांच्या मूळ अधिवासात सोडायला डाॅक्टर तज्ज्ञांची चमू आली होती. ट्रान्झिट सेन्टर या मदतीने या माकडांना त्यांच्या मूळ अधिवासात मुक्त करण्यात आले. जंगलात नेऊन पिंजऱ्याचे दार उघडताच, आनंदाने उड्या मारत या माकडांनी जंगलाकडे धूम ठोकली.

Web Title: The monkeys returned to Vidarbha after experimenting with the corona vaccine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.