पावसाळा आला पण सिवरेज लाईन नाही; गोधनीच्या नागरिकांची नगरपंचायतवर धडक
By गणेश हुड | Published: June 18, 2024 09:38 PM2024-06-18T21:38:14+5:302024-06-18T21:38:33+5:30
नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायत गोधनी रेल्वे येथे मागील सहा महिण्यापासुन सांडपाण्याची समस्या असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळा आला असतानाही सांडपाणी व्यवस्थापनाची (सिवरेज लाईन) कोणतीही व्यवस्था नाही, ले-आऊटमधील रस्त्यांची समस्या, नाल्या बांधकाम, वीजेचे पोल हटविणे अशा समस्या मार्गी लागत नसल्याने गोधनी रेल्वे येथील त्रस्त शेकडो नागरिकांनी मंगळवारी गोधनी रेल्वे नगरपंचायत कार्यालयावर धडक दिली. पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी समस्या मार्गी न लागल्यास नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी दिला.
नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायत गोधनी रेल्वे येथे मागील सहा महिण्यापासुन सांडपाण्याची समस्या असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
येथील लेआऊ कामे केली जात असल्याच्या तक्रारी आहे, ग्रामपंचायतीत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना खाजगी कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे. यासंर्भात शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. १५ दिवसात नागरिकांच्या समस्या मार्गी न लागल्यास कार्यालयाला कुलूप लावले जाईल. असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.