पावसाळा संपला, आजपासून पर्यटकांसाठी पेंचही खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:39 AM2023-10-02T11:39:59+5:302023-10-02T11:40:21+5:30

इतर अभयारण्ये १० ऑक्टाेबरला सुरू हाेतील

Monsoon is over, from today even Pench tiger reserve is open for tourists | पावसाळा संपला, आजपासून पर्यटकांसाठी पेंचही खुले

पावसाळा संपला, आजपासून पर्यटकांसाठी पेंचही खुले

googlenewsNext

नागपूर : ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्पही २ ऑक्टाेबरपासून पर्यटकांसाठी सुरू करण्यात येत आहे. पावसाळा संपण्याची चाहूल लागताच वनविभागातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाेबत उमरेड कऱ्हांडलाचे कऱ्हांडला प्रवेशद्वारही साेमवारपासून पर्यटनासाठी सुरू हाेत आहे. या प्रकल्पांचे इतर गेट आणि बाेर व्याघ्र प्रकल्प सुरू हाेण्यास पर्यटकांना १० ऑक्टाेबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहेत.

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक तसेच पेंच व बाेर प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. प्रभूनाथ शुक्ल यांनी रविवारी याबाबत परिपत्रक जारी केले. विशेष म्हणजे पावसाळ्यामुळे मागील तीन महिन्यांपासून व्याघ्र प्रकल्पांची सफारी बंद हाेती. विशेष म्हणजे पावसाळ्यामुळे बंद असलेल्या चंद्रपूरच्या ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारीसुद्धा रविवारपासून सुरू करण्यात आली आहे. पेंच प्रकल्पाच्या काही गेटमधूनच सध्या सफारी सुरू करण्यात येत आहे. यामध्ये सिल्लारी व खुर्सापार पर्यटन सफारी प्रवेशद्वार साेमवारपासून पर्यटनासाठी खुले करण्यात येत आहेत. पर्यटन सुरू झाले असले तरी ऑनलाइन सफारी बुकिंग १० ऑक्टाेबरपासूनच सुरू हाेणार आहे.

पवनी उमरेड कऱ्हांडला अभयारण्य येथील गोठणगाव व पवनी पर्यटन प्रवेशद्वार तसेच बाेर अभयारण्याची सफारीसुद्धा १० ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे. वरील सर्व पर्यटन सफारी प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीवर अवलंबून असून स्थानिक परिस्थितीनुसार सफारी मार्गात व सफारी अंतरात बदल संभवू शकतो, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Monsoon is over, from today even Pench tiger reserve is open for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.