नागपुरात आगमनातच जाेरात बरसला मान्सून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 11:30 PM2021-06-11T23:30:43+5:302021-06-11T23:31:07+5:30
Monsoon rains नागपूरसह संपूर्ण विदर्भात शुक्रवारी मान्सूनचे ढग जाेराने बरसले. तसे दाेन दिवसापासून थांबून थांबून पाऊस हजेरी लावत आहे. मात्र शुक्रवारी सकाळपासून आगमनाची झलक दाखविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात शुक्रवारी मान्सूनचे ढग जाेराने बरसले. तसे दाेन दिवसापासून थांबून थांबून पाऊस हजेरी लावत आहे. मात्र शुक्रवारी सकाळपासून आगमनाची झलक दाखविली. सकाळी दीड तास गडगडाटासह मेघ जाेशाने बरसले. मग काही वेळ थाेडीथाेडी रिपरिप चाली व नंतर दिवसभर उसंत मिळाली. मात्र रात्री ८.३० वाजतानंतर पुन्हा पावसाचा जाेश वाढला. ४५ मिनिटे ढगांमधून जलधारा बरसत राहिल्या. त्यानंतर रिपरिप चालली. सकाळी ५.६ मिमी. पावसाची नाेंद करण्यात आली. पुढचे चार दिवस आणखी नागपूरच्या आकाशात मान्सूनची मेहरबानी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
हवामान विभागानुसार बंगाल खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याच ठिकाणी मान्सूनचे ढग आधी सक्रिय झाले. ही स्थिती पाऊस पडण्यास अनुकूल आहे. येत्या १५ जूनपर्यंत विदर्भासह शेजारील मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. दरम्यान पावसाळा सक्रिय झाल्याने कमाल तापमानात सरासरीपेक्षा ८ अंशाने घट झाली असून ते ३१.१ अंश नाेंदविण्यात आले. रात्रीचे तापमानही ५ अंशाने घसरून २२.१ अंशावर पाेहचले. रात्रीचे तापमान २४ तासात २.७ अंशाने घसरले.
१५ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट
नागपूरसह विदर्भात येत्या १५ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट घाेषित करण्यात आला आहे. यादरम्यान वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता आहे. शुक्रवारी वाशिम येथे ७०, अमरावती येथे ४२.८, यवतमाळात २१, गाेंदियामध्ये १४.८, ब्रम्हपुरी येथे १३, वर्धा ८.२, गडचिराेली ८.८ तर अकाेला येथे ७.६ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
झाड पडले, दाेन जखमी
रात्री झालेल्या पावसामुळे धरमपेठ, खरे टाऊनजवळ गुलमाेहराचे एक माेठे झाड काेसळले. हे झाड प्लेजर क्रमांक एमएच-३१, डीपी-२०९३ या गाडीवर पडले. गाडीवर मधुसूदन दुबे व पराग काेटावार हे दाेन व्यक्ती बसले हाेते. झाडाच्या फांद्या त्यांच्यावर पडल्याने ते जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन विभागाचे फायरमन संजय शेंबेकर, चालक कृपाशंकर दीक्षित, शालिकराव काेठे आदी मदत व बचावकार्यात सहभागी हाेते.