पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 01:06 AM2018-07-21T01:06:18+5:302018-07-21T01:10:44+5:30
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी तर विधानसभेत हरिभाऊ बागडे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा केली. पुढील अधिवेशन मुंबईत १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे यासंदर्भात लोकमतने दिलेले वृत्त अखेर खरे ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी तर विधानसभेत हरिभाऊ बागडे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा केली. पुढील अधिवेशन मुंबईत १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे यासंदर्भात लोकमतने दिलेले वृत्त अखेर खरे ठरले.
४ जुलै ते २० जुलै दरम्यान पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान विधानसभा व विधान परिषदेतील एकूण कामकाज पुढीलप्रमाणे राहिले;
विधानसभा
एकूण बैठक संख्या : १३
प्रत्यक्ष कामकाज : ८६ तास १९ मिनिटे
अन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ : ८ तास १९ मिनिटे
मंत्री अनुपस्थितीमुळे वाया गेलेला वेळ : १० मिनिटे
रोजचे सरासरी कामकाज : ६ तास ३९ मिनिटे
एकूण तारांकित प्रश्न : ९६६९
स्वीकृत प्रश्न : ८१३
तोंडी उत्तरे : ३६
प्राप्त अल्पसूचना : ०९
स्वीकृत अल्पसूचना : ०१
प्राप्त लक्षवेधी सूचना : २७६०
स्वीकृत लक्षवेधी : ११४
लक्षवेधीवर चर्चा : ४२
एकूण स्थगन प्रस्तावाच्या सूचना : ११३
अल्पकालीन चर्चेची सूचना - ०१
एकूण विधेयके संमत : २३
अर्धा-तास चर्चेच्या सूचना : २४६
स्वीकृत सूचना : १०८
अशासकीय ठरावांच्या सूचना : ४०८
अशासकीय ठरावाच्या सूचना मान्य : २५४
नियम २९३ अन्वये प्राप्त सूचना : ०४
सूचनेवर चर्चा : ३
सदस्यांची एकूण सरासरी उपस्थिती : ७६.४२ टक्के
जास्तीत जास्त उपस्थिती : ८६.४३ टक्के
कमीत कमी उपस्थिती - १३.७ टक्के
विधान परिषद
एकूण बैठक संख्या : १३
प्रत्यक्ष कामकाज : ७४ तास १२ मिनिटे
अन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ : ८ तास १७ मिनिटे
मंत्री अनुपस्थितीमुळे वाया गेलेला वेळ : १० मिनिटे
रोजचे सरासरी कामकाज : ५ तास ४२ मिनिटे
एकूण तारांकित प्रश्न : २७१८
स्वीकृत प्रश्न : ९५८
तोंडी उत्तरे : ४७
नियम ९३ च्या प्राप्त सूचना : १५८
स्वीकृत सूचना : ८८
निवेदने झालेल्या सूचनांची संख्या : २१
सभागृहच्या पटलावर ठेवलेली : ६७
औचित्याचे मुद्दे : प्राप्त २२०, मांडण्यात आलेले १६५
प्राप्त लक्षवेधी सूचना : ९५५
स्वीकृत लक्षवेधी : २२०
लक्षवेधीवर चर्चा : ५२
विशेष उल्लेख प्राप्त सूचना : २१३
मांडण्यात आलेल्या सूचना : ७९
नियम ९७ अन्वये चर्चा : ०८
नियम ४६ अन्वये निवेदन : ०६
नियम २६० ्अन्वये प्रस्तावावर चर्चा - ०२
विधेयके संमत : २२