मान्सून विदर्भाच्या वाटेवर; पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:57+5:302021-06-10T04:06:57+5:30
नागपूर : मान्सून आता विदर्भाच्या वाटेवर असून येत्या रविवारपर्यंत तो धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, हा संपूर्ण ...
नागपूर : मान्सून आता विदर्भाच्या वाटेवर असून येत्या रविवारपर्यंत तो धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, हा संपूर्ण आठवडा विदर्भात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मंगळवारी विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरण एकदमच बदलले असून तापमानाचा पारा बराच खालावला आहे. मागील २४ तासात वर्धा, नागपूर, बुलढाणा, अकोला या ठिकाणी पाऊस झाला. यामुळे मंगळवारी रात्रीच्या तापमानात बदल झाला होता. अमरावती आणि वाशिममध्ये सर्वात कमी तापमान होते. दिवसभरात कुठेही पारा ३९ च्या पुढे गेला नाही.
हवामान विभागाने पुढील चार दिवस सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तर १२ जूनला भंडारा, गोंदीया, गडचिरोली या जिल्ह्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह जोराच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
...
विदर्भातील तापमान जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३८.९ : २५.५
अमरावती : ३४.८ : २५.५
बुलडाणा : ३६.० : २४.०
चंद्रपूर : ३८.२ : २६.८
गडचिरोली : ३६.० : २७.४
गोंदिया : ३७.५ : २७.०
नागपूर : ३८.८ : २५.९
वर्धा : ३७.८ : २५.८
वाशिम : ३४.० : २१.०
यवतमाळ : ३८.५ : अप्राप्त
...