पाेहण्याचा माेह जीवावर बेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:07+5:302021-08-17T04:14:07+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : धाेकादायक असलेल्या अनाेळखी डाेहात पाेहायला उतरणे तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना सालबर्डी (ता. माेर्शी, जिल्हा ...

The month of watching is over | पाेहण्याचा माेह जीवावर बेतला

पाेहण्याचा माेह जीवावर बेतला

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : धाेकादायक असलेल्या अनाेळखी डाेहात पाेहायला उतरणे तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना सालबर्डी (ता. माेर्शी, जिल्हा अमरावती) परिसरात रविवारी (दि. १५) दुपारी घडली. मृत तरुण हा जलालखेडा येथील रहिवासी आहे. सुटी असल्याने ताे मित्रांसाेबत सालबर्डी परिसरात देवदर्शन व फिरायला गेला हाेता.

सातपुडा डाेंगरात असलेले सालबर्डी हे ठिकाण रमनीय असल्याने तरुण मंडळी या ठिकाणी फिरायला व महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. डाेंगराच्या पायथ्याशी असलेल्या माडू व गाडगा या दाेन नद्या वाहतात. या नद्यांच्या संगमावर डाेह आहे. विशाल राजेंद्र कांबळे (२१, रा. जलालखेडा, ता. नरखेड) हा स्वातंत्र्य दिनाची सुटी असल्याने त्याच्या १२ मित्रांसाेबत सालबर्डीच्या डाेंगरात फिरायला व तिथे असलेल्या महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेला हाेता.

त्या डाेहात पाेहण्याचा विशालसाेबत त्याच्या मित्रांना पाेहण्याचा माेह झाला. सर्वांनी त्या डाेहात पाेहण्यासाठी उड्या घेतल्या. विशालने उडी मारली; पण ताे वर आला नाही. त्यामुळे मित्रांनी त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात शाेध घेत त्याला बाहेर काढले व लगेच माेर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह जलालखेडा येथे आणला व साेमवारी (दि. १६) त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

धाेकादायक हत्तीडाेह

या परिसरातील सातपुडा डाेंगरांवर भगवान महादेवासह अन्य देवादिकांची मंदिरे आहेत. डाेंगराच्या पायथ्यशी माडू व गाडगा या दाेन नद्यांना संगम आहे. याच संगमावर असलेला डाेह हा हत्तीडाेह नावाने ओळखला जाताे. या डाेहात पाेहण्याचा बहुतांना माेह हाेताे. या हत्तीडाेहात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याने हा डाेह धाेकादायक बनला आहे. याबाबत पर्यटकांना माहिती दिली जात असली तरी पाेहण्याचा माेह अनावर हाेत असल्याने कुणीही याकडे लक्ष देत नाही.

Web Title: The month of watching is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.