गली मे आज चाँद निकला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:10 AM2018-10-24T01:10:37+5:302018-10-24T01:11:22+5:30
बहारदार शब्द सूरांच्या, चंद्र-चांदण्यात विशेष बहरणाऱ्या ‘यू सजा चाँद’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वरधूनी संस्थेतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रोत्यांसाठी हा खास नजराना होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहारदार शब्द सूरांच्या, चंद्र-चांदण्यात विशेष बहरणाऱ्या ‘यू सजा चाँद’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वरधूनी संस्थेतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रोत्यांसाठी हा खास नजराना होता.
गायिका अंशु बुटी व वंदना देशभ्रतार यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात नवोदित व हौशी गायकांनी सुरेल गायनातून कोजागिरीच्या चंद्राच्या मधूर गंध स्पर्शाची अनेक रोमांचक गीते यावेळी सादर केली. अंशू व वंदना यांच्यासह अंशुका काळे, पलक आर्या, सुनीता कळंबे, प्रशांत वालिकर, अशोक बागुल, गोपाल अय्यर, गणेश चव्हाण, स्वप्नील गोडे, दिलीप गाडवे या सहभागी गायकांचा समावेश होता. चंद्र-चांदण्यांच्या प्रकाशात प्रेमिकांच्या भावनांना येणारा पूर तर दुसरीकडे विरही जनांना व्याकुळ करणाऱ्या भावनांनी सजलेल्या सुंदर गीतांनी सिनेसंगीताचे दालन सजले आहे. त्यातील काही निवडक गीते गायक कलावंतांनी सादर केली.
‘गली मे आज चाँद निकला..., दिल की नजर से..., निले निले अंबर पे चाँद जब आये..., चाँद शिफारीश जो करता हमारी..., रुक जा रात ठहर जा रे चंदा..., चेहरा है या चाँद खिला..., ये रात भीगी भीगी..., यू सजा चाँद...’ अशी काही गोड गाणी रसिकश्रोत्यांना भावविभोर करणारी ठरली. निवेदन सुचेता चव्हांडके यांचे होते. यावेळी राजेंद्र चोपडे, सुनीता कांबळे, हर्षल पराते, लकी हे तांत्रिक सहयोगी होते. आयोजनात अभिजित पोफळे व आशित बुटी यांचा सहभाग होता.