विद्वत्तेसोबत प्रॅक्टीसमध्ये नैतिकता आवश्यक : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:01 AM2018-01-05T00:01:14+5:302018-01-05T00:08:27+5:30

प्रगत ज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानावर आपले भविष्य अवलंबून आहे. परंतु विद्वत्तेसोबत सामाजिक दायित्वही आवश्यक आहे. सामाजिक दायित्वाचे पालन करीत आपले कार्य केल्यास डॉक्टरांना पूर्ण समाधान मिळेल. आपल्या ‘प्रॅक्टीस’मध्ये नैतिकता दिसली पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.

Morality with erudition should be in practice : Nitin Gadkari | विद्वत्तेसोबत प्रॅक्टीसमध्ये नैतिकता आवश्यक : नितीन गडकरी

विद्वत्तेसोबत प्रॅक्टीसमध्ये नैतिकता आवश्यक : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्दे५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’ चे थाटात उद्घाटन

आॅनलाईन लोकमत
नागपूर : प्रगत ज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानावर आपले भविष्य अवलंबून आहे. परंतु विद्वत्तेसोबत सामाजिक दायित्वही आवश्यक आहे. सामाजिक दायित्वाचे पालन करीत आपले कार्य केल्यास डॉक्टरांना पूर्ण समाधान मिळेल. आपल्या ‘प्रॅक्टीस’मध्ये नैतिकता दिसली पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
भारतीय बालरोग परिषद नागपूर शाखेच्या यजमानपदाखाली आयोजित ५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’ला गुरुवारपासून सुरुवात झाली. यात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, सीआयएपीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संतोष सोअन्स, मावळते अध्यक्ष डॉ. अनुपम सचदेव, नवनिर्वाचित सचिव डॉ. रमेश कुमार, मावळते सचिव डॉ. बकुल पारेख, डॉ. दिगंत शास्त्री, परिषदेचे मुख्य आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर, परिषदेचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर, सचिव डॉ. जयंत उपाध्ये प्रामुख्याने उपस्थित होते.
अमेरिकेत दरवर्षी सुमारे दोन लाख ‘पेटेंट’ची नोंदणी होत असताना भारतात मात्र दोन ते अडीच हजारच ‘पेटेंट’ची नोंदणी होते. आपल्याकडे संशोधनाला घेऊन आवश्यक त्या सोई उपलब्ध होत नाही, अशी खंत व्यक्त करीत नितीन गडकरी म्हणाले, जगात दहा चांगल्या डॉक्टरांमध्ये चार भारतीय डॉक्टर आहेत. मात्र आपल्याकडे आजही सरकारी रुग्णालयांची स्थिती बिकट आहे. रुग्णालयाची स्थिती बळकट करण्यासाठी सामाजिक संस्थांनी सामोर येणे गरजेचे आहे. शिवाय भारतात आणखी नऊ लाख डॉक्टरांची आवश्यकता असून अधिक डॉक्टर तयार झाले पाहिजेत. त्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती होणे गरजेचे आहे.
१२ पंचतारांकित रुग्णालय
नितीन गडकरी म्हणाले, जहाजबांधणी मंत्रालयाच्या जागेवर लवकरच १२ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यात येणार आहे. हजार खाटांचे हे रुग्णालय पंचतारांकित असेल. यात ६० टक्के गरीब रुग्णांसाठी तर ४० टक्के व्यावसायिकतेसाठी वापर होईल.
मावळते अध्यक्ष डॉ. सचदेव यांनी गेल्या वर्षभरात आयपीएद्वारे चालविलेल्या विविध कार्यक्र माची व उपक्र मांची माहिती दिली. ‘आयपॅन’ प्रकल्प ही महत्त्वाची उपलब्धी असल्याचेही त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संतोष सोअन्स म्हणाले की, तीन दशकांपूर्वी ‘आयपीए’शी जुळलो आणि आयुष्य बदलले. आता या संस्थेत अध्यक्ष म्हणून काम करताना कृतज्ञ असल्याचे सांगत भूतकाळ विसरून खिलाडूवृत्ती दाखविण्याचे आवाहन उपस्थित बालरोगतज्ज्ञांना केले. या प्रसंगी डॉ. उदय बोधनकर व डॉ. जयंत उपाध्ये यांनीही आपले विचार मांडले.
प्रास्ताविक डॉ. वसंत खळतकर यांनी केले. नवनिर्वाचित सचिव रमेश कुमार यांनी अहवाल वाचन केले. मावळते अध्यक्ष डॉ. अनुपम सचदेव यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. अनुपम सचदेव यांनी डॉ. सोअन्स यांना पदक प्रदान करीत संस्थेचा कार्यभार सोपविला. या प्रसंगी डॉ. विराज शिंगाडे व डॉ. प्रगती खळतकर निर्मित ‘पेडिकॉन थीमसाँग’ची चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.
संचालन डॉ. राजीव मोहता यांनी तर आभार डॉ. प्रवीण पागे यांनी मानले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, नागपूर शाखेला ‘नॅशनल अ‍ॅण्टिबायोटिक डे’, ‘टीनेज डे’, ‘डॉटर डे’ आणि ‘हेल्थी लाईफ स्टाईल डे’ या गटात चार पुरस्कारही प्रदान करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्र माची सांगता झाली.
मंचावर डॉ. विरल कामदार, डॉ. अरुप रॉय, डॉ. हरमेश सिंग, डॉ. गुना सिंग, डॉ. केदार मालवटकर आदी उपस्थित होते. परिषदेच्या आयोजनासाठी परिषदेचे मीडिया प्रमुख डॉ. अविनाश गावंडे, डॉ. सुचित बागडे, डॉ. गिरीश चरडे, यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.

 

Web Title: Morality with erudition should be in practice : Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.