पूर्व नागपुरात अत्याधुनिक रुग्णालय बनणार : कृष्णा खोपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:48 PM2021-05-25T23:48:06+5:302021-05-25T23:49:35+5:30
Krishna Khopade, hospital स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुनापूर भागात अत्याधुनिक रुग्णालय बनविण्यात येणार आहे. यासाठी साडेपाच एकरची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. येथील रुग्णालयाकरता अपोलो-लीलावती रुग्णालयाच्या प्रमुखांनी तयारी दाखविली असल्याची माहिती पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली आहे. त्यांनी या भागाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुनापूर भागात अत्याधुनिक रुग्णालय बनविण्यात येणार आहे. यासाठी साडेपाच एकरची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. येथील रुग्णालयाकरता अपोलो-लीलावती रुग्णालयाच्या प्रमुखांनी तयारी दाखविली असल्याची माहिती पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली आहे. त्यांनी या भागाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
पारडी-पुनापूर-भरतवाडा येथे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत हाउसिंगच्या एकूण सात इमारतीपैकी तीन इमारतीचा कामाची सुरुवात झाली आहे. सात इमारतींमध्ये ६७२ फ्लॅट व ४८ दुकानांची गाळे राहणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ज्यांची लहान घरे रस्त्याच्या कामात जात असतील त्यांना हे फ्लॅट मिळणार आहेत, असे खोपडे यांनी सांगितले. या निरीक्षण दौऱ्यात लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, नगरसेवक दीपक वाडीभस्मे, वैशाली वैद्य, देवेंद्र मेहर, स्मार्ट सिटीचे राजेश दुपारे, राहुल पांडे, संजय मानकर, देवेंद्र बिसेन, अनिल कोडापे, प्रामुख्याने उपस्थित होते.
संथ कामाबाबत नाराजी
पावनगांव येथील जुना पूल नष्ट करून ३० मीटर पुलाच्या कामाची सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत पाण्याची टाकी, नागनदीवर ब्रिज, रस्त्याची कामे, नळाची पाइपलाइन आदी कामे मंदगतीने सुरू असल्याबाबत खोपडे यांनी नाराजी व्यक्त केली असून, गती वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.