१५० हून अधिक अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:47+5:302021-09-24T04:09:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी शहराच्या विविध भागांतील १५० हून अधिक अतिक्रमण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी शहराच्या विविध भागांतील १५० हून अधिक अतिक्रमण हटविले. कारवाईदरम्यान २ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
लक्ष्मीनगर, गांधीबाग व आसीनगर झोन क्षेत्रात विविध भागांत ही कारवाई करण्यात आली.
लक्ष्मीनगर क्षेत्रातील आयटी पार्क ते माटे चौक, दुर्गामाता मंदिर ते मंगलमूर्ती चौक, पुढे जयताळा चौकाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यालगतची ४० अतिक्रणे हटविण्यात आली. पथकाने एक ट्रक साहित्य जप्त केले. गांधी बाग झोनच्या पथकाने झोन कार्यालयासमोरील १५ ते २० कापड विक्रेत्यांना हटविले. त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशन ते बडकस चौक या मार्गावरील ८० अतिक्रमणे हटिवण्यात आली.
तिसऱ्या पथकाने आसीनगर झोन क्षेत्रातील रानी दुर्गावती चौक ते मो. रफी चौक, जयभीम चौक ते परत राणी दुर्गावती चौक व वैशालीनगर चौकादरम्यान अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. पथकाने एक ट्रक साहित्य जप्त केले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात सुनील बावने, राहुल रोकडे, विशाल ढोले व पथकांनी केली.