३८ महिन्यांत १८ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:33 AM2018-04-09T05:33:03+5:302018-04-09T05:33:03+5:30
उपराजधानीत नागरिक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१५ सालापासून ३८ महिन्यांत शहरात १८ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या.
Next
नागपूर : उपराजधानीत नागरिक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१५ सालापासून ३८ महिन्यांत शहरात १८ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील दोन हजार जणांचा शोध लागलेला नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस विभागाकडे १ जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीतील बेपत्ता झालेल्या नागरिकांविषयी विचारणा केली होती. प्राप्त माहितीनुसार या काळात शहरातून १८ हजार ३३८ नागरिक बेपत्ता झाले.