एप्रिलमध्ये ४ लाखांहून अधिक कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:09 AM2021-05-20T04:09:24+5:302021-05-20T04:09:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे, ...

More than 4 lakh corona tests in April | एप्रिलमध्ये ४ लाखांहून अधिक कोरोना टेस्ट

एप्रिलमध्ये ४ लाखांहून अधिक कोरोना टेस्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे, त्यानुसार महापालिका व खासगी प्रयोगाशाळांमध्ये आतापर्यंत १८ लाख ८९ हजार ६९४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ४ लाख २६ हजार ४९३ चाचण्या एप्रिल २०२१ मध्ये करण्यात आल्या. यात मनपा प्रशासनाची महत्त्वाची भूमिका आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, नागपूर शहरात यावर्षी एप्रिलमध्ये ४,२६,४९३ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली.

सरासरी दररोज १४,००० हून अधिक नागरिकांची चाचणी करण्यात आली. मे महिन्यात १६ मेपर्यंत २ लाख ९ हजार ३९० नागरिकांच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. आताही मनपातर्फे दुकानांमध्ये, बाजारपेठेत, गर्दीच्या ठिकाणी मोफत चाचणी करण्यात येत आहे.

शहरात कोरोनाची लाट मार्च २०२० पासून झाली आणि मागच्या वर्षी मार्चमध्ये ९१८ नागरिकांची चाचणी करण्यात आली. एप्रिल २०२० मध्ये ५,९८६, मे २० मध्ये २१,४९१, जून २० मध्ये ३०,२०२, जुलै २० मध्ये ४४,५०८, ऑगस्ट २० मध्ये ८०,७२३ चाचण्या करण्यात आल्या. सप्टेंबरमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले.

त्या महिन्यात १ लाख ४९ हजार १५८ चाचण्या करण्यात आल्या. ऑक्टोबरमध्ये यामध्ये आणखी वाढ करण्यात आली आणि १ लाख ५८ हजार ८३० नागरिकांच्या चाचण्या करून पहिल्या लाटेवर नियंत्रण आणण्यात यश प्राप्त झाले. मनपा आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य यंत्रणेला दर महिन्याला एक लाखपेक्षा जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या निर्देशाला अनुसरुन आरोग्य विभागाने खासगी प्रयोगशाळांच्या मदतीने नोव्हेंबर-२० मध्ये १ लाख ३८ हजार ५३३, ‍डिसेंबर २० मध्ये १ लाख १३ हजार ५३९, जानेवारी २१ मध्ये १ लाख ०६ हजार ९०३, फेब्रुवारीमध्ये १ लाख २७ हजार ८६० चाचण्या केल्या. यादरम्यान कोरोनाचे केसेस कमी होत्या.

Web Title: More than 4 lakh corona tests in April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.