सहा वर्षात राज्यात ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:42 PM2018-09-29T23:42:31+5:302018-09-29T23:43:25+5:30
राज्यात विविध प्रकारे जागृती करूनदेखील वीजचोरीचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. २०१२ सालापासून सहा वर्षात राज्यात विविध ठिकाणी महावितरणतर्फे ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. यांची किंमत १२३ कोटींहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात विविध प्रकारे जागृती करूनदेखील वीजचोरीचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. २०१२ सालापासून सहा वर्षात राज्यात विविध ठिकाणी महावितरणतर्फे ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. यांची किंमत १२३ कोटींहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१२ ते मार्च २०१८ या कालावधीत राज्यात वीजचोरीची किती प्रकरणे समोर आली, भरारी पथकांच्या छाप्यात किती रुपयाच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या, किती वीज चोºयांची माहिती खबºयांकडून प्राप्त झाली व खबºयांना किती रोख रक्कम देण्यात आली याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार एप्रिल २०१२ ते मार्च २०१८ या कालावधीत राज्यात वीजचोरीची ५८९३३ प्रकरणे आढळून आली. यातील सर्वात जास्त ११४०३ प्रकरणे २०१६-१७ मध्ये समोर आली. महावितरणच्या भरारी पथकाने मारलेल्या छाप्यांमध्ये या सहा वर्षांच्या कालावधीत १२३ कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांच्या वीजचोºया उघडकीस आल्या.
वर्षभरात ३९ कोटींच्या वीजचोरी उघडकीस
महावितरणने मागील काही काळापासून कारवाईचा वेग वाढविला आहे. २०१७-१८ या वर्षात ९९२० वीजचोरी उघडकीस आल्या. या चोरींचे मूल्य ३९ कोटी ८२ लाख २३ हजार रुपये इतके होते. २०१२ पासूनची ही वर्षभरातील सर्वात जास्त रक्कम ठरली.
१० टक्के प्रकरणांची माहिती खबऱ्यांकडून
एप्रिल २०१२ ते मार्च २०१८ या कालावधीत खबऱ्यांकडून ६२३८ वीजचोरींची माहिती कळाली. या माहितीच्या आधारे महावितरणच्या भरारी पथकाने संबंधित ठिकाणी छापे मारले. खबऱ्यांना या माहितीसाठी ६४ लाख ६० हजार ६११ रुपयांची रोख रक्कम देण्यात आली.
वर्षनिहाय वीजचोरी
वर्ष सापडलेल्या वीजचोरी उघडकीस आलेल्या वीजचोरीची रक्कम (लाखांमध्ये)
२०१२-१३ ८,२६१ १९४२.५१
२०१३-१४ ८,३५७ १३०९.८२
२०१४-१५ ९,९५६ १३९६.५२
२०१५-१६ ११,०३६ १८१२.७२
२०१६-१७ ११,४०३ १८६२.०४
२०१७-१८ ९,९२० ३९८२.२३