प्राध्यापकांकडून पाच वर्षांत अकराशेहून अधिक ‘रिसर्च पेपर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:00+5:302021-09-04T04:12:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘नॅक’च्या चमूचा दौरा सुरू असून संशोधनासंदर्भातील बाबदेखील गंभीरतेने विचारात ...

More than eleven hundred research papers by professors in five years | प्राध्यापकांकडून पाच वर्षांत अकराशेहून अधिक ‘रिसर्च पेपर’

प्राध्यापकांकडून पाच वर्षांत अकराशेहून अधिक ‘रिसर्च पेपर’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘नॅक’च्या चमूचा दौरा सुरू असून संशोधनासंदर्भातील बाबदेखील गंभीरतेने विचारात घेतली जाते. ‘रिसर्च पेपर’च्या बाबतीत नागपूर विद्यापीठाची कामगिरी चांगली राहिली आहे. २०१५-१६ पासून पाच वर्षांत नागपूर विद्यापीठातील विविध पदव्युत्तर विभागांतील शिक्षकांचे विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अकराशेहून अधिक ‘रिसर्च पेपर्स’ प्रकाशित झाले. शिवाय शिक्षकांनी लिहिलेल्या किंवा संपादित केलेल्या पुस्तकांची संख्या साडेतीनशेच्या घरात होती. विद्यापीठाच्या अशा कामगिरीच्या बळावर यंदा ‘ए’ किंवा ‘ए प्लस’ दर्जा मिळेल असा दावा केला जात आहे.

‘पेटंट’च्या बाबतीत विद्यापीठातील प्राध्यापक काहीसे मागे असले तरी संकल्पना ‘रिसर्च पेपर’च्या माध्यमातून मांडण्यात आघाडीवर आहेत. २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत प्राध्यापकांकडून १ हजार १८० ‘रिसर्च पेपर’ प्रकाशित झाले. २०१९-२० मध्ये ही संख्या २२६ इतकी होती. ‘नॅक’समोर ही सर्व आकडेवारी मांडण्यात आली असून चमूनेदेखील समाधान व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच पाच वर्षांच्या कालावधीत चारही विद्याशाखांच्या प्राध्यापकांनी विविध पातळ्यांवर पुस्तकांचे लेखन व संपादन केले. त्याची संख्या ३४८ इतकी होती. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक १०६ पुस्तके लिहिल्या किंवा संपादित करण्यात आली होती.

२७ हून अधिक संशोधन प्रकल्प, सहा कोटींहून अधिक अनुदान

पाच वर्षांच्या कालावधीत विविध पदव्युत्तर विभागातील प्राध्यापकांनी २७ संशोधन प्रकल्प राबविले. त्यांना विविध सरकारी संस्थांकडून ६ कोटी २७ लाख ३२ हजारांचे अनुदान मिळाले. याशिवाय या कालावधीत संशोधन व उद्योग क्षेत्रातील विविध संस्थांसोबत संयुक्त उपक्रम राबविण्यात आले. ही संख्या ११७ इतकी होती. शिवाय ‘कन्सल्टन्सी’ किंवा प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून विद्यापीठाला ३४ लाखांहून अधिक महसूल प्राप्त झाला.

प्रकाशित झालेले रिसर्च पेपर

वर्ष : रिसर्च पेपर

२०१५-१६ : २३८

२०१६-१७ : २०४

२०१७-१८ : २९६

२०१८-१९ : २१६

२०१९-२० : २२६

प्रकाशित झालेली पुस्तके

वर्ष : पुस्तके

२०१५-१६ : १०६

२०१६-१७ : ७०

२०१७-१८ : ६६

२०१८-१९ : ८०

२०१९-२० : २६

संशोधन प्रकल्पांना मिळालेले अनुदान

वर्ष : अनुदान

२०१५-१६ : २ कोटी ८६ लाख ८० हजार

२०१६-१७ : २१ लाख ४० हजार

२०१७-१८ : ९८ लाख ९९ हजार

२०१८-१९ : २ कोटी १८ लाख

२०१९-२० : २ लाख १३ हजार

इतर संस्थांसोबत संशोधन उपक्रम

वर्ष : उपक्रम

२०१५-१६ : १९

२०१६-१७ : १८

२०१७-१८ : २८

२०१८-१९ : ३०

२०१९-२० : २२

Web Title: More than eleven hundred research papers by professors in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.